Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO: फलंदाजीमध्ये फ्लॉप होऊन पुन्हा बेजबाबदारपणे वागला Virat Kohli; भर मैदानात केलं असं की...!

कोहली बाद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.

VIDEO: फलंदाजीमध्ये फ्लॉप होऊन पुन्हा बेजबाबदारपणे वागला Virat Kohli; भर मैदानात केलं असं की...!

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त त्याच्यावर खिळल्या होत्या. कोहली पाच महिन्यांच्या कालावधीनंतर टीम इंडियासाठी टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र केवळ 1 रन करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली बाद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.

विराट फलंदाजीमध्ये चांगला खेळ करू शकला नाही, मात्र फिल्डींग दरम्यान तो एका वेगळ्या मूडमध्ये दिसून आला. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना विराट मस्तीच्या मूडमध्ये दिसला. 

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांसोबत मस्ती करताना दिसला. यावेळी विराटने खूश होऊन चाहत्यांसाठी भांगडा देखील केला. कोहलीचा हा डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसतोय. मात्र यावरून अनेकांनी विराटला ट्रोल करत टीका केली आहे.

टीम इंडियाचा विजय 

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडमध्ये टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. रोहितसेनेने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका खिशात घातली. टीम इंडियाचे गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. 

टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 171 रन्सचं आव्हान दिलं होते. मात्र  भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 17ओव्हरमध्ये 121 धावांवरच गुंडाळलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. तर डेव्हिड विलीने नाबाद 33 रन्स केल्या. मात्र तो टीमला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला.

Read More