Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फादर्स डेच्या दिवशी विराट कोहली झाला भावुक, वडिलांसाठी लिहली खास पोस्ट; शेअर केला बालपणीचा फोटो

Virat Kohli Instagram Post on Father's Day: विराट कोहलीने त्याच्या वडिलांची आठवण काढत एक भावनिक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली. त्यासोबत बालपणीचा एक फोटोही शेअर केला आहे. 

फादर्स डेच्या दिवशी विराट कोहली झाला भावुक, वडिलांसाठी लिहली खास पोस्ट; शेअर केला बालपणीचा फोटो

Virat Kohli on Father's Day: 15 जून 2025, फादर्स डेच्या निमित्ताने जगभरात लोकांनी वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली गेली. अनेकांनी फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपापल्या वडिलांबद्दल पोस्ट लिहल्या. भारतीय क्रिकेटचा स्टार विराट कोहलीसुद्धा या दिवशी आपल्या दिवंगत वडिलांना आठवून भावूक झाला. त्याने एक मनाला भिडणारी पोस्ट शेअर केली, ज्यात वडिलांनी दिलेल्या शिकवणीबद्दल त्याने एक आठवण सांगितली. या खास दिवशी विराटची मुलगी वामिका कोहली हिनेही तिच्या वडिलांसाठी एक गोड चिठ्ठी लिहिली, जी अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केली.

वडिलांच्या आठवणीत विराटची भावुक पोस्ट 

विराट कोहलीचे वडील प्रेमनाथ कोहली यांचे निधन 18 डिसेंबर 2006 रोजी झाले होते. त्यावेळी विराट रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळत होता. त्यानंतर आजपर्यंत तो अनेकदा वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना दिसला. 

हे ही वाचा: सनराइजर्स हैदराबाद मालकिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची नेट वर्थ माहित आहे? आहे कोट्यवधींची संपत्ती

 

फादर्स डेच्या दिवशी विराटने काय लिहले?

"वडिलांनी मला शिकवलं की शॉर्टकटवर विश्वास ठेवू नकोस. जर तुझ्यात खरंच काहीतरी विशेष असेल, तर मेहनतीतून ते नक्कीच समोर येईल. आणि जर तुझ्यात मेहनत करण्याची तयारीच नसेल, तर कदाचित तू त्या गोष्टीसाठी लायकच नाहीस." एकदा मला एक सोपा मार्ग सुचवण्यात आला होता, पण वडिलांनी तो नाकारला. त्यांनी शांतपणे आणि  विश्वासाने सांगितलं "जर तू खरोखरच चांगला असशील, तर तू स्वतःचा मार्ग शोधशील. आणि नसलास, तर लवकरच जाणून घेऊन चांगलं आहे." 

त्या क्षणाने माझ्या विचारसरणीला, माझ्या काम करण्याच्या पद्धतीला आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनालाच पूर्णपणे बदलून टाकला. सर्व वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा" 

हे ही वाचा: पतौडी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत सचिन तेंडुलकरने उचलले मोठे पाऊल, BCCI आणि ECB ला केली खास विनंती

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

वामिकाकडून वडिलांसाठी गोड चिठ्ठी

फादर्स डेच्या दिवशी अनुष्का शर्मानेही एक पोस्ट शेअर केली, ज्यात तिने स्वतःच्या वडिलांना आठवण काढली आणि त्याचबरोबर वामिकाने लिहिलेली एक छोटीशी चिठ्ठीही शेअर केली.

 

हे ही वाचा: BCCI ला ICC कडून मोठा झटका! भारत पुढील 6 वर्षे WTC फायनलचे आयोजन करू शकणार नाही? जाणून घ्या मोठे कारण

वामिकाच्या  चिठ्ठीत काय आहे?

"ते माझ्या भावासारखे दिसतात. ते खूप मजेदार आहेत. ते मला गुदगुल्या करतात. मी त्यांच्यासोबत मेकअप खेळते. मला त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांनाही माझ्यावर खूप प्रेम आहे."

Read More