Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराटला येतेय अनुष्काची आठवण, शेअर केला असा फोटो

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अद्यापही टीम इंडियाला दोन मॅचेस खेळायच्या आहेत. शेवटची मॅच २४ फेब्रुवारी रोजी खेळली जाणार आहे त्यानंतर टीम इंडिया भारतात परतेल.

विराटला येतेय अनुष्काची आठवण, शेअर केला असा फोटो

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अद्यापही टीम इंडियाला दोन मॅचेस खेळायच्या आहेत. शेवटची मॅच २४ फेब्रुवारी रोजी खेळली जाणार आहे त्यानंतर टीम इंडिया भारतात परतेल.

अनुष्काची येतेय आठवण

नुकतचं विराट आणि अनुष्का यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यानंतर अनुष्कासोबत विराट खूपच कमी वेळ राहीला आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला रवाना झाला. त्यामुळे आता विराटला अनुष्काची खूपच आठवण येत असल्याचं दिसत आहे.

फोटो केला शेअर

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

सिनेमाचं प्रमोशन

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेली टीम इंडिया नव-नवे रेकॉर्ड्स करत आहे. आपल्या टीमचा परफॉरमन्स पाहून विराटही खूप आनंदी आहे. मात्र, त्याला अनुष्काची खूपच आठवण येत आहे. अनुष्काचा 'परी' हा सिनेमा होळीच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. विराट कोहली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्काच्या 'परी' सिनेमाचं प्रमोशन करत आहे.

विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोला विराटने My on and Only! असं कॅप्शन दिलं आहे.

 

My one and only!

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विजयाचं श्रेय  अनुष्काला

नुकत्याच झालेल्या वन-डे क्रिकेट सीरिजमध्ये ५-१ ने विजय मिळाल्यानंतर विराटने विजयाचं श्रेय अनुष्कालाही दिलं होतं. कोहलीने म्हटलं की, त्याची पत्नी अनुष्का संपूर्ण सीरिजमध्ये त्याला प्रोत्साहन देत होते आणि त्यामुळे या सीरिजमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यास मदत झाली.

Read More