Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट कोहलीच्या हातात IPL ट्रॉफी अन् रस्त्याच्या दुतर्फी बंगळुरुकरांची गर्दी, आनंदोत्सव क्षणाचा व्हिडीओ अनुष्काने केला शेअर

आयपीएल 2025 च्या फायनल मॅचमध्ये पंजाब किंग्जवर मात करत आरसीबीने 18 वर्षांचं वनवास संपवलं. हातात ट्रॉफी आणि बंगळुरुच्या रस्त्यावर चाहत्यांची तुफान गर्दीचा व्हिडीओ अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

विराट कोहलीच्या हातात IPL ट्रॉफी अन् रस्त्याच्या दुतर्फी बंगळुरुकरांची गर्दी, आनंदोत्सव क्षणाचा व्हिडीओ अनुष्काने केला शेअर

गेल्या 18 वर्षांपासून बंगळुरु असो किंवा पंजाब आयपीएलची ट्रॉफी हातात घेण्यासाठी वाट पाहत होते. अखेर मंगळवारी तो क्षण आला पंजाबचं स्वप्न धुळाला मिळालं आणि बंगळुरुने आपल्या स्वप्नाला अखेर गवसणी घातली. अनेक वेळा जेव्हा आयपीएल फायनलमध्ये पोहोचूनही विजयी ट्रॉफी हातातून निसटली. त्या प्रत्येक वेळी विराटच्या पाठीशी अनुष्का शर्मा उभी होती. मंगळवारी पहिल्यांदाच 18 वर्षांनंतर आरसीबीसह विराट कोहलीचं हे स्वप्न पूर्ण झालं. फायनलमध्ये ऐतिहासिक विजयानंतर पती विराटला मिठी मारण्यासाठी धावल्यानंतर, हे जोडपे आता सत्कार समारंभासाठी बेंगळुरूला आलंय. त्यानंतर बंगळुरूमधील रस्त्यांवर आनंदोत्सव दिसून येत आहे. 

अखेर 18 वर्षांनंतर तो क्षण आला...!

बुधवारी, अनुष्काने चाहत्यांना विराट कोहलीची पहिली झलक सोनेरी आयपीएल ट्रॉफीसह दाखवली. आनंदाने ओतप्रोत झालेल्या कोहलीने ट्रॉफी जवळ धरली आणि संघ बसमधून कार्यक्रमस्थळी पोहोचला. व्हिडीओचे मुख्य आकर्षण म्हणजे आरसीबीचे चाहते शहरातील रस्त्यांवर उतरून आनंद साजरा करत होते. बेंगळुरूमध्ये अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर करताना अनुष्काने लिहिलंय की, “नम्मा बेंगळुरूचे सध्याचे दृश्य.” तिने पार्श्वभूमीत एआर रहमान आणि सिड श्रीराम यांच्या गाण्यासोबत प्रार्थना करणारे हात इमोजी देखील जोडले.

यापूर्वी, बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी सांगितले होते की, बुधवारी शहरात संघाचा कोणताही विजय रॅली होणार नाही. त्याऐवजी, एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात येमार आहे. त्यामुळे दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना विधान सौध आणि चिन्नास्वामी स्टेडियमजवळील रस्त्यांवरून जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

पीटीआय नुसार, गृहमंत्री जी परमेश्वर यांनी या अपडेटला दुजोरा दिला आणि सुरक्षेच्या कारणास्तव अशी कोणतीही विजय परेड होणार नाही. 

"संघ बसने विधान सौधा येथे येईल आणि सत्कारानंतर बसने क्रिकेट स्टेडियममध्ये जाईल. खुल्या वाहनातून कोणतीही मिरवणूक होणार नाही, कर्नाटक राज्य क्रिकेट अकादमीने सुरक्षेचा विचार करून त्याला नकार दिला आहे. मुख्यमंत्री संघाचा सत्कार केल्यानंतर एक किंवा दोन जण संघाच्या वतीने बोलू शकतात, त्याशिवाय काहीही होणार नाही. स्टेडियममध्ये, केएससीएचा कार्यक्रम आहे. सर्व प्रकारची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे," असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघाचा गौरव राज्य विधिमंडळ आणि सचिवालयाच्या प्रतिष्ठित विधान सौधाच्या पायऱ्यांवर करतील. "मी सर्व आरसीबी संघ सदस्यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या चाहत्यांचेही अभिनंदन करतो. संपूर्ण देश आणि राज्याला त्यांचा अभिमान आहे, आरसीबीने कधीही आयपीएल जिंकलेले नाही, हा अठरावा हंगाम आहे आणि त्यांनी जिंकले आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे," असे सिद्धरामय्या म्हणाले. 

Read More