Virat Kohli in Ayodhya before IPL 2025 playoffs: अवघ्या चार दिवसांनी होणाऱ्या आयपीएल 2025 च्या प्लेऑफ सामन्याआधी विराट भक्तीमध्ये लीन झालेला दिसला. येणाऱ्या प्लेऑफ सामन्यांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) चा अनुभवी फलंदाज विराट कोहली अयोध्येला पोहोचला आहे. अयोध्येत यावेळी त्याच्या सोबतीला अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माचीही सोबत होती. दोघांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. कोहलीच्या या अध्यात्मिक भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
रामलल्लाचे दर्शन घेतल्या नंतर दोघांनी प्रसिद्ध हनुमान गढी मंदिरातही जाऊन दर्शन घेतले. मंदिराचे महंत संजय दास महाराज यांनी सांगितले की, “कोहली आणि अनुष्काला अध्यात्माबद्दल विशेष ओढ आहे. दर्शनानंतर दोघांशी काही अध्यात्मिक चर्चा देखील झाल्या.”
यापूर्वी कोहली-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातही गेले होते. तिथे अनुष्का शर्मा भावूक झाल्याचा किस्सा चर्चेत आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Indian Cricketer Virat Kohli, along with his wife and actor Anushka Sharma, visited and offered prayers at Hanuman Garhi temple in Ayodhya. pic.twitter.com/pJAGntObsE
— ANI (@ANI) May 25, 2025
दरम्यान, कोहली IPL 2025 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 12 सामन्यांत त्याने 60.88 च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत, ज्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीची स्ट्राइक रेट 145.35 इतकी आहे. रनचेसमध्ये त्याची कामगिरी खास राहिली असून त्याने चार वेळा 50+ धावा केल्या आहेत.
सध्या फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली प्लेऑफमध्येही दमदार कामगिरी करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.