Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वनडे क्रमवारीत विराटबरोबर आणखी एक भारतीय पहिल्या क्रमांकावर

आयसीसीनं घोषित केलेल्या वनडेच्या नव्या क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

वनडे क्रमवारीत विराटबरोबर आणखी एक भारतीय पहिल्या क्रमांकावर

मुंबई : आयसीसीनं घोषित केलेल्या वनडेच्या नव्या क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर बॉलरच्या यादीमध्ये भारताचाच जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसीनं सोमवारी ही नवी क्रमवारी जाहीर केली आहे. 884 पॉईंट्ससह विराट बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा 842 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टॉप 10 मध्ये शिखर धवनलाही जागा मिळाली आहे. शिखर धवन 802 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

बॉलरच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह 797 पॉईंट्ससह अव्वल क्रमांकावर आहे. भारताचा स्पिनर कुलदीप यादव 700 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा राशीद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर युझवेंद्र चहल 11व्या क्रमांकावर आहे.

देशांच्या यादीमध्ये भारत 122 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 127 पॉईंट्स असलेली इंग्लंड वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. वनडे क्रमवारीत अव्वल स्थान टिकवायचं असेल तर इंग्लंडला श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज जिंकावी लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून श्रीलंकेमध्ये या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Read More