Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs BAN: Virat Kohl ने KL Rahul ला काय दिला कानमंत्र?, हा Video पाहू तुम्हाला येईल अंदाज

India vs Bangladesh, T20 WC :टीम इंडियाचे स्टार खेळाडूंवर आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आहे. टीम इंडियातील एक नाव केएल राहुल...याची बॅटिंग सध्या शांत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहे. अशातच सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

IND vs BAN: Virat Kohl ने KL Rahul ला काय दिला कानमंत्र?, हा Video पाहू तुम्हाला येईल अंदाज

fallbacks

Virat Kohli-KL Rahul Video Viral : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाचा सामना आज म्हणजेच बुधवारी बांगलादेशशी (Bangladesh) होणार आहे. T20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताचे (India ) आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. यातील दोन सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. टीम इंडियाचा ओपनर  केएल राहुल (KL Rahul) तीनही सामन्यात फेल ठरला. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सामन्यामध्ये त्याच्यावर टांगती तलवार होती. मात्र टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी राहुलबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. आजच्या मॅचमध्ये केएल राहुल खेळणार आहे. 

विराट-राहुलचा व्हिडिओ व्हायरल (Virat Kohli-KL Rahul Video Viral)

T20 वर्ल्डकप 2022 मध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करण्यासाठी बांगलादेशवर मात करणे गरजेचं आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडूंवर आजच्या विजयाची सगळी जबाबदारी आहे. टीम इंडियातील एक नाव केएल राहुल...याची बॅटिंग सध्या शांत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी नाराज आहे. अशातच सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

कोहलीच्या टिप्सचा होणार का फायदा? 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा उपकर्णधार केएल राहुलला बॅटिंगचे टिप्स देत आहेत. अॅडलेडमध्ये टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यानचा हा व्हिडिओ आहे, जो सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

राहुलचा फॉर्म गायब 

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल सध्या फॉर्मात नाही. स्पर्धेतील तीन सामन्यांत त्याने एकूण 22 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध त्याच्या बॅटने 9-9 धावा केल्या, तर पाकिस्तानविरुद्ध तो केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे आजच्या सामन्यात कोहलीच्या टिप्सनंतर राहुल चमकदार कामगिरी करणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

Read More