Virat Kohli Future Prediction Viral Video : मागील 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत विराट कोहलीने अनेक रेकॉर्डस् आपल्या नावे केले. तसेच या स्टार खेळाडूने भारताचं नावं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उज्ज्वल केलं. टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर विराट कोहलीने टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, तर मे 2025 मध्ये त्याने टेस्ट क्रिकेटला सुद्धा रामराम ठोकला. आता विराट फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार विराट आणि त्याची पत्नी अनुष्काने त्यांचं लंडनमध्ये सुद्धा घर बनवलं असून जेव्हा विराट नॅशनल ड्युटीवर नसेल तेव्हा तो कुटुंबासोबत वेळ घालवतो. सध्या विराटकडे सर्व काही आहे आणि तो आनंद जीवन लागतोय. मात्र असं असताना एका ज्योतिषाने विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक भविष्यवाणी केली आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
इंस्टाग्रामवर astrosushil नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलेला आहे. ज्यात ज्योतिष सुशील यांनी विराट कोहलीची वाईट वेळ लवकरच सुरु होणार अशी भविष्यवाणी केली आहे. सुशीलने सांगितले की, 'मी विराट कोहलीची कुंडली बघितली आहे. तेव्हा मला कळले की नोव्हेंबर 2025 नंतर त्याच्या कारकिर्दीला उतरतीकळा लागेल आणि त्याची वाईट वेळ सुरु होईल'. astrosushil ने सांगितले की विराट कोहलीचं वय 36 वर्ष झालं असून त्याला जेवढी कमाई करायची होती त्याने तेवढी केली आहे.
विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा हे दोघे आपल्या मुलांसह लंडनला सेटल होणार अशा बातम्या मध्यंतरी समोर येत होत्या. विराटच्या लहानपणीच्या कोचने देखील याबाबत माहिती दिली होती. मात्र ज्योतिषी सुशील यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं की, 'विराटचं भारताबाहेर जाण भविष्यात अशुभ असेल. कारण त्याला खूप गंभीर असा आजार सुद्धा होऊ शकतो'. विराटच्या लंडन येथे जाण्यावरून ज्योतिषाने हा मुद्दा मांडला.
इंस्टाग्रामवर astrosushil नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये ज्योतिषी सुशील यांनी सांगितलं की, 'विराटच्या आयुष्यातील आता केवळ 30 वर्षच शिल्लक आहेत. सध्या विराटचं वय 36 आहे तेव्हा पुढे त्याचं आयुष्य वयाच्या 66 वर्षांपर्यंतच दिसतंय'.
(Disclaimer - विराट कोहलीच्या कुंडली आणि भविष्याबाबतचा व्हिडीओ हा इंस्टाग्रामवर astrosushil नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. झी 24 तास याची पुष्टता आणि समर्थन करत नाही. या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)