Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Virat Kohli: 25 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली, ऋषभ पंत बाहेर

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.   

 Virat Kohli: 25 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली, ऋषभ पंत बाहेर

Virat Kohli, Delhi Ranji Trophy Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विराट कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामना खेळताना दिसणार आहे. कोहली या देशांतर्गत स्पर्धेत दिल्ली संघाकडून खेळताना दिसणार आहे. या गोष्टीची अखेरीस पुष्टी झाली आहे. दिल्ली संघाला रेल्वेविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्ली संघ विरुद्ध रेल्वेचा संघ हा सामना 30 जानेवारीला होणार आहे. यासाठी दिल्ली संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विराट खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे विराट कोहली अवघ्या 25 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. 

कोणाच्या नेतृत्वाखाली खेळणार किंग कोहली? 

रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली संघ रेल्वेविरुद्ध सामना 30 जानेवारीला खेळणार आहे. यासाठी दिल्ली संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 25 वर्षीय आयुष बडोनी संघाचे नेतृत्व करत आहे. यामुळे विराट आता आयुष बडोनीच्या  नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

 हे ही वाचा: 2 तास 3 मिनिटांचा तो थ्रिलर चित्रपट, जिवंत शरीरातून हृदय काढून विकले; याच्या कथा आणि सस्पेन्सपुढे 'दृश्यम'ही फेल

 

विराट 12 वर्षांनंतर खेळणार सामना 

डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, "विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी खेळणार आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दिल्लीचे खेळाडूही या सामन्यात विराट कोहलीसोबत खेळण्यासाठी उत्सुक आहेत." विराटने शेवटचा रणजी सामना २०१२ मध्ये खेळला होता. त्याच्या शेवटचा रणजी सामना गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्धचा होता. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नियम 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईसाठी रणजी सामने खेळले आहेत. तर शुभमन गिल पंजाबकडून सामने खेळला आहे.

 हे ही वाचा: भारताच्या 'या' रेल्वे स्टेशनवर घ्यावा लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, तरच येतो प्रवेश करता

 

ऋषभ पंत पडला बाहेर 

दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय टीमचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या सामन्यातून बाहेर पडला आहे. तो आत्तापर्यत दिल्लीसाठी एकच रणजी सामना खेळला आहे. हा सामना 23-25 ​​जानेवारी दरम्यान राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध खेळला गेला होता.

 हे ही वाचा: Video: 150.3kmph वेगाने आलेल्या चेंडूवर मारला 'सुपर सिक्स'! तिलकचा हा शॉट एकदा बघाच

 

रेल्वे विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्ली संघ

आयुष बडोनी (कर्णधार), विराट कोहली, प्रणव राजवंशी (यष्टीरक्षक), सनत संगवान, अर्पित राणा, मयंक गुसैन, शिवम शर्मा, सुमित माथूर, वंश बेदी (यष्टीरक्षक), मणि ग्रेवाल, हर्ष त्यागी, सिद्धांत शर्मा, नवदीप सैनी, यश धुल , गगन वत्स, जॉन्टी सिद्धू, हिम्मत सिंग, वैभव कंदपाल, राहुल गेहलोत आणि जितेश सिंग.

Read More