Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जेव्हा ३७ दिवसांनी मैदानावर परतला भारताचा हा 'शेर'

आयपीएलचा ११वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यासाठी सर्व संघांनी, संघाच्या कर्णधारांनी तसेच खेळाडूंनी कंबर कसण्यास सुरुवात केलीये. परदेशी क्रिकेटर्स भारतात येऊ लागलेत. यातच भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीही मैदानात उतरलाय.

जेव्हा ३७ दिवसांनी मैदानावर परतला भारताचा हा 'शेर'

मुंबई : आयपीएलचा ११वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यासाठी सर्व संघांनी, संघाच्या कर्णधारांनी तसेच खेळाडूंनी कंबर कसण्यास सुरुवात केलीये. परदेशी क्रिकेटर्स भारतात येऊ लागलेत. यातच भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीही मैदानात उतरलाय.

fallbacks

विराट कोहली ३७ दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या जर्सीमध्ये विराट कोहलीने मैदानावर वर्कआउट केले तसेच त्याने फलंदाजीचा सरावही केला. 

fallbacks

द. आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या विराटने अखेरचा सामना २२ फेब्रुवारीला खेळला होता. हा आफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी-२० सामना होता. या सामन्यात भारताने ६ विकेटनी विजय मिळवला. 

fallbacks

यावेळी विराटच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे कारण आतापर्यंत त्याच्या संघाने एकदाही आयपीएलचा खिताब जिंकलेला नाहीये. त्यामुळे यावेळी त्यांचा संघ जेतेपद जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

fallbacks

विराट या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्यांना बंगळूरु संघाने १७ कोटी रुपयांना रिटेन केले

फोटो साभार - सर्व फोटो @RCBTweets, IANS

Read More