Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'नशिबामुळे विराट इथपर्यंत पोहोचला', पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 

'नशिबामुळे विराट इथपर्यंत पोहोचला', पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण नशिबामुळे विराट कोहली इथपर्यंत पोहोचला असं वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर अब्दुल रझाकने केलं आहे. विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे. पण बीसीसीआयचा पाठिंबा मिळाल्यामुळे तो नशीबवान आहे, असं अब्दुल रझाक म्हणाला आहे.

बीसीसीआयकडून विराट कोहलीचा सन्मान केला जातो, त्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवण्याची प्रेरणा मिळते. पाकिस्तानमध्येही विराटपेक्षा चांगला खेळाडू व्हायची क्षमता असणारे आहेत, पण आपल्या यंत्रणांमुळे अशा खेळाडूंना डावललं जातं, अशी प्रतिक्रिया रझाकने दिली. 

वादग्रस्त वक्तव्य करण्याची रझाकची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आयपीएल-११ आणि पीएसएल-११ मध्ये मॅच झाली तर पीएसएल-११चा विजय होईल, असं रझाक म्हणाला होता. लग्नानंतरही आपले स्त्रीयांशी संबंध होते, असं रझाकने लाईव्ह कार्यक्रमात सांगितलं होतं. तसंच वर्ल्ड कपदरम्यान रझाकने मोहम्मद शमीचा धर्म काढला होता. 

रझाकने याआधी जसप्रीत बुमराहचा उल्लेख बेबी बॉलर असा केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी ग्लेन मॅकग्रा आणि वसीम अक्रमसारख्या दिग्गज फास्ट बॉलरचा सामना केला होता. बुमराहच्या बॉलिंगवर मी सहज आक्रमण केलं असतं, असं रझाक म्हणाला होता.

Read More