IPL 2025 : आयपीएल 2025 मधील 46 वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB VS DC) यांच्यात पार पडला. या दिल्ली कॅपिटल्सचं होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबीने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) मैदानात येत केएल राहुल (KL Rahul) समोर एक असं सेलिब्रेशन केलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विराटने राहुलला जशास तसं उत्तर दिलं. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यात रविवारी आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करून 8 विकेट गमावून 162 धावा केल्या. तर आरसीबीला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान आरसीबीच्या फलंदाजांनी 18.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून पूर्ण केले. या विजयानंतर विराट मैदानात आला आणि केएल राहुल उभा होता त्या ठिकाणी पोहोचला. विराटने नंतर केएल राहुल समोर जमिनीकडे ईशारा करत 'हे माझं मैदान' असं म्हणून सेलिब्रेशन केलं. विराटने गंमतीत राहुलला आठवण करून दिली की दिल्ली हे त्याचं होम ग्राउंड आहे. यासोबतच विराटने राहुलकडून जुना बदला पूर्ण केला. विराटने यावेळी केएल राहुलला चिन्नस्वामी स्टेडियमवरील घटनेची आठवण करून दिली होती, जिथे आरसीबी विरुद्ध सामन्यात विजयी खेळी खेळल्यावर केएल राहुलने KGF स्टाईलने 'हे माझं मैदान' असं सेलिब्रेशन केलं होतं.
Told you Virat Kohli wouldn't forget KL Rahul's Kantara celebration in Bengaluru and would bring it out either while celebrating or teasing KL at his home ground in Delhi. pic.twitter.com/YIYJQtRpIM
— Kriti Sharma (Kriti_Sharma01) April 27, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थानावर आहेत. त्यांनी 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.521 असा असून सध्या त्यांच्या खात्यात 14 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्स असून त्यांचा नेट रनरेट +1.104 आहेत. तर तिसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स असून त्यांचा नेट रनरेट हा +0.889 असा आहे.