Virat Kohli's Brother on Rahul Vaidya : काही दिवसांपूर्वी लोकप्रिय गायक सिंगर राहुल वैद्य आणि विराट कोहलीच्या फॅन्समध्ये वाढत असलेल्या वादाची सगळीकडे चर्चा होती. अखेर आता विराट कोहलीच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं या सगळ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर राहुल वैदनं कोहलीचा उल्लेख हा जोकर म्हणून केला होता त्याचं कारण म्हणजे विराटनं इन्स्टाग्रामवर अभिनेत्री अवनीत कौरच्या एका फोटोला चुकून लाईक करणं होतं. त्यानं केलेल्या या लाइकसाठी विराटनं 'इन्स्टाग्राम एल्गोरिदमची गडबड' असल्याचं म्हटलं होतं. त्यावर राहुल वैद्यनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला यावर हसू अनावर झाल्याचं म्हटलं आहे. तर त्यानं इतकं देखील सांगितलं की विराट कोहलीनं त्याला अनेक वर्षांपूर्वी ब्लॉक देखील केलं आहे.
आता विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली याने राहुलच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्याने थ्रेड्सवर स्पष्ट भाषेत एक पोस्ट केली. 'बाळा, जर इतकी मेहनत तुझ्या गायणावर केली असती तर कदाचित स्वत: च्या मेहनतीने प्रसिद्ध झाला असतास. एकीकडे संपूर्ण देश हा सध्य स्थितीवर लक्ष देत केंद्रित करून आहे की काय होतंय... तर हा मुर्ख विराटचं नाव घेऊन फॉलोवर्स वाढवण्यासाठी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे.... हे कितपत योग्य आहे.'
राहुल वैद्यनं कोहलीची थट्टा मस्करी करण्यासाठी केलेल्या पोस्टनंतर हे सगळं व्यक्त त्याच्या भावानं केलं आहे. राहुलने एका पोस्टमध्ये म्हटले होते, 'आजपासून असं होऊ शकतं की एल्गोरिदममुळे काही फोटो लाइक करेल, जे मी स्वत: केले देखील नसतील. त्यामुळे जी कोणी मुलगी असेल, कृपया त्या गोष्टीचा पीआर करू नका. कारण ही माझी चुक नाही, ही इन्स्टाग्रामची चुक आहे.'
त्याशिवाय राहुलनं एक इन्स्टाग्राम स्टोरी देखील शेअर केली होती. त्यात तो म्हणाला होता की 'मला असं वाटतं की मला इन्स्टाग्रामवर विराटनं ब्लॉक केल्याचं तुम्हाला माहितीये. आता मला वाटतं की ही पण एक इन्स्टाग्रामची गडबड असावी, जे एल्गोरिदमनं विराटला सांगितलं असेल की एक काम करतो तुझ्याबाजूनं मी राहुल वैद्यला ब्लॉक करतो. ठीक आहे ना.'
हेही वाचा : पाकिस्तानला गिफ्ट म्हणून रवीना टंडनच्या नावाचं मिसाइल! ऑपरेशन सिंदूरनंतर 'तो' फोटो व्हायरल
दरम्यान, या सगळ्यात एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यात राहुल एका इव्हेंटमध्ये स्टेजवर अनुष्का शर्मासाठी गाणं गात असल्याचे दिसत आहे. राहुल तिच्या हाताला किस करताना दिसतो आणि आता त्याचे मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी म्हटलं की विराटनं हा व्हिडीओ पाहूनच राहुल वैद्यला ट्रोल केलं असेल.