Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'वर्ल्डकप २०१९' मध्ये 'एक्स फॅक्टर' ठरणार कुलदीप आणि युजवेंद्र- कोहली

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांच्याविषयी मोठ वक्तव्य केलं आहे.

 'वर्ल्डकप २०१९' मध्ये 'एक्स फॅक्टर' ठरणार कुलदीप आणि युजवेंद्र- कोहली

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांच्याविषयी मोठ वक्तव्य केलं आहे.

हे दोघे २०१९ वर्ल्ड कपमध्ये तुरूपाचे एक्के ठरणार असल्याचे विराटने म्हटले आहे. 

२१ विकेट 

 या जोडीने वन डे सिरिजमध्ये साऊथ आफ्रिकेच्या बॅट्समन्सना खूप त्रास दिला. आतापर्यंत ६ वन डे मॅच सिरीजमध्ये त्यांनी सुरूवातीच्या ३ मॅच मध्ये मिळून २१ विकेट घेतल्या आहेत. 
 
 केपटाऊनमध्ये बुधवारी झालेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये दोघांनी मिळून ८ विकेट घेतल्या. त्यामुळे एकवेळ मजबूत स्थितीत दिसणारी आफ्रिकेची फेळी काही वेळातच ढेपाळली. 

एक्स फॅक्टर 

अशाच परिस्थीतीत आम्ही घराबाहेर वर्ल्डकप खेळू आणि मला विश्वास आहे, हे २ टीम मेंबर 'एक्स फॅक्टर' सिद्ध होणार आहेत. 

माझ्याकडे शब्द नाहीत 

वर्ल्ड कप खेळण अजून दूरची गोष्ट आहे. पण या दोघे आपल्या खेळाने आपली दावेदारी भक्कम करत आहेत.

माझ्याकडे यांच्यासाठी शब्द नाहीत. दोन्ही खेळाडू आपल्या खेळावर अधिक मेहनत घेत आहेत,असेही विराट कोहलीने सांगितले.  

Read More