Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Team India : मला अभिमान वाटतो की...! नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतो...

Virat Kohli Meet PM Narendra Modi : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याने आज टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यावर त्याने भावना व्यक्त केल्यात.

Team India : मला अभिमान वाटतो की...! नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतो...

Virat Kohli With PM Modi : टी-ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता टीम इंडियाचं भारतात आगमन झालं आहे. टीम इंडियाने दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान यांनी दिलेलं आमंत्रण स्विकारलं अन् त्यांची भेट घेतली. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देणारा सामनावीर विराट कोहली याने आज टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर विराट कोहलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. यामध्ये विराट कोहलीने दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विराट कोहली आणि मोदींचा हस्तांदोलन करतानाचा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये टीम इंडिया आणि पंतप्रधानांसोबत ट्रॉफीसह दिसत आहेत. 

काय म्हणाला विराट कोहली?

आज आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटून खूप अभिमान वाटतो. आम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सर, असं विराट कोहलीने पोस्ट करत म्हटलं आहे. तर मोदींनी देखील टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत करत पोस्ट केली. आपल्या चॅम्पियन खेळाडूंचं कौतूक वाटतं. त्याशी बोलणं झालं आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे त्यांचे अनुभव जाणून घेतले, असंही विराट कोहली म्हणाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

दरम्यान,  भारतय क्रिकेट संघ मुंबई विमानतळावर दाखल झालाय. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं क्रिकेटप्रेमींनी जोरदार स्वागत केलं. मुंबई विमानतळासह, ज्या मार्गाने टीम इंडियाची बस जाणार आहे, त्या मार्गावर चाहत्यांची गर्दी झालीय. हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडिअमवर विशेष बसनं पोहोचणार आहेत. त्या वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची गर्दी झालीय.

Read More