मुंबई : विराट कोहली (Virat Kohli)च्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्डकप २०१९ खेळला. पण भारताचा सेमीफायलनमध्ये पराभव झाला. राउंड रॉबिन स्पर्धत १५ अंकानी टीम इंडिया पहिल्या स्थानावर होती. भारतीय टीम (Indian Team) सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात १८ रन्सने पराभूत झाली. या पराभवा बरोबरच विराट कोहली ब्रिगेडचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न देखील अपूर्ण राहिलं. वर्ल्डकपच्या पराभवाला बाजुला सारत टीम इंडिया आता वेस्टइंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. (West Indies tour) वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय टीमला तीन टी-२०, तीन वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. वर्ल्डकप नंतर विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा गुरुवारी स्वदेशी परतले. पण भारतात येताच विराटने वर्कआऊट सुरु केलं आहे.
विराटने ट्विटरवर जिममध्ये वेट ट्रेनिंग करताना व्हिडिओ पोस्ट केला आहे. फोटोला कॅप्शन देत त्याने म्हटले की, 'मेहनतीला पर्याय नाही.' वेस्टइंडिज दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा शुक्रवारी होणार होती पण आता रविवारी ही घोषणा होणार आहे. विराट कोहलीला या दौऱ्यात आराम दिला जाऊ शकतो. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे आणि टी२० चा कर्णधार बनवलं जाऊ शकतं. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला देखील आराम दिला जाऊ शकतो.
Hard work has no substitute.
— Virat Kohli (@imVkohli) July 19, 2019
Music - @thescript pic.twitter.com/vuVxc9Djjm
वेस्टइंडीज दौऱ्यासाठी कोणत्या युवा खेळाडूंना संधी मिळेल याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. युवा खेळाडू शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि पृश्वी शॉ यांच्या नावांचा देखील विचार होऊ शकतो. स्पिनर राहूल चहर आणि फास्ट बॉलर नवदीप सैनीसोबतच खलील अहमद, दीपक चहर आणि आवेश खान यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. टी-२० मॅच तीन ते सहा ऑगस्ट दरम्यान खेळली जाईल. तर वनडे ८ ते १४ ऑगस्ट आणि टेस्ट सामने २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर खेळले जाणार आहेत.