Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट कोहलीच्या बहिणीने मोहम्मद सिराजसाठी लिहिली भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर Viral, म्हणाली "तो एक..."

Virat Kohli Sister Bhawna Post: ओव्हल कसोटीतील भारताच्या ऐतिहासिक विजयाचा नायक मोहम्मद सिराज यांना विराट कोहलीची बहीण भावना हिने भावनिक संदेश दिला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.   

 विराट कोहलीच्या बहिणीने मोहम्मद सिराजसाठी लिहिली भावनिक पोस्ट, सोशल मीडियावर Viral, म्हणाली

Virat Kohli Sister Post for Mohammed Siraj: अलीकडेच भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात दमदार टेस्ट मालिका सामने झाले. ओव्हल टेस्टमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय घडवून आणणाऱ्या मोहम्मद सिराजवर सध्या देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बहीण भावना कोहली-ढींगरा हिनंही सिराजसाठी एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

काय आहे भावना कोहली पोस्ट?

इन्स्टाग्रामवर भावना कोहलीने सिराजच्या दोन फोटोसह एक संदेश शेअर केला. पहिल्या फोटोत लॉर्ड्सच्या मैदानावर भावूक झालेला सिराज दिसतो, तर दुसऱ्या फोटोत ओव्हलवर भारताच्या विजयाचा जल्लोष करतानाचा क्षण आहे. यासोबत तिने लिहिलं "हे खेळ नेहमी काहीतरी चमत्कारिक करतात. काही खेळाडू खरेच प्रेरणादायी असतात, जे आशा आणि सकारात्मकतेवर विश्वास ठेवायला लावतात. @mohammedsirajofficial YOU ARE GREAT."

 

विराट कोहलीनेही केलं कौतुक

विराट कोहलीनेही ‘X’ (पूर्वीचं ट्विटर) वरून मोहम्मद सिराजच्या कामगिरीचं तोंडभरून कौतुक केलं. त्याने लिहिलं "टीम इंडियाची शानदार विजय. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या समर्पणामुळेच ही विजय शक्य झाला. विशेषतः सिराज, जो नेहमीच संघासाठी सर्वस्व झोकून देतो. त्याच्या कामगिरीबद्दल खूप अभिमान वाटतो."

मालिकेतील सर्वोच्च विकेट घेणारा सिराज!

पाच कसोटींमध्ये एकूण 24 विकेट्स घेत सिराजने मालिकेतील सर्वोत्तम गोलंदाज ठरल्याचं सिद्ध केलं. त्याने 185.3 ओव्हर्सची मॅरेथॉन गोलंदाजी करत ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या डावात 5 बळी घेतले आणि भारताला अवघ्या 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.

टीम इंडियाला मिळाली मालिका बरोबरी

सिराजच्या या शानदार प्रदर्शनामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2-2 ने बरोबरीत राखली. जसप्रीत बुमराह अनुपस्थित असतानाही सिराजने आघाडीचा गोलंदाज म्हणून जबाबदारी लीलया पेलली.

हैदराबादमध्ये जल्लोषात स्वागत

विजयानंतर सिराज मुंबईमार्गे आपल्या मूळ गावी हैदराबादला पोहोचला. विमानतळावर चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. अनेकांनी सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी गर्दी केली, मात्र सिराज थेट पुढच्या फ्लाइटसाठी रवाना झाला.

टीम इंडियाचा खरा ‘मॅचविनर’

मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो केवळ एक विश्वासार्ह गोलंदाज नाही, तर गरज पडली तर एकट्यानेही सामना फिरवणारा टीम इंडियाचा खरा मॅचविनर आहे.

Read More