Virat Kohli tells BCCI he Wants to Retire: दोन दिवसांपूर्वी भारताचा स्टार खेळाडू रोहितने आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्या पाठोपाठ आता भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली निवृत्तीच्या विचारात आहे. विराटबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीने भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआय) सांगितले आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विराट कोहलीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
"त्याने त्याचा विचार पक्का केला आहे आणि तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे बोर्डाला कळवले आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा येत असल्याने बीसीसीआयने त्याला यावर पुन्हा विचार करायला सांगितले आहे. त्याने अद्याप आमच्या विनंतीवर काहीही उत्तर दिले नाही." असे सूत्रांनी या वृत्तपत्राला सांगितले. रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी कसोटी निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीचा हा निर्णय आला आहे. पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती काही दिवसांत बैठक घेणार आहे.
हे ही वाचा: Hardik Pandya: जवानाला बघून हार्दिक पांड्याने ठोकला सॅल्यूट, चाहत्यांचे जिंकले मन; Video Viral
विराट कोहली फक्त 36 वर्षांचा आहे आणि तो आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो. त्याचा फिटनेसची खूप उत्तम आहे. त्यामुळे ही बातमी त्याच्या चाहत्यांना निराश करू शकते. विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये विराटने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा डबल शतके केली आहेत.
हे ही वाचा: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, 'या' ट्विटमुळे आला अडचणीत; नेटिझन्सने शिकवला धडा
रोहित शर्मा पाठोपाठ कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता विराट कोहलीचा हा निर्णय भारतीय संघासाठी चांगला नाही. याचे कारण असे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) निवड समिती पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच संघ निवडणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेपासून विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल चर्चा होती. तो तेव्हापासूनच या निवृतीईचा विचार करत असल्याचे मानले जाते.