Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

LIVE मॅचमध्ये विराट कोहली कोणाच्या पाया पडला? Viral Videoने चाहत्यांच्या मनात उपस्थित केला प्रश्न

India vs New Zealand, Virat Kolhi Viral Video: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ च्या सामन्यादरम्यान रविवारी दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात असे काही घडले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.   

LIVE मॅचमध्ये विराट कोहली कोणाच्या पाया पडला? Viral Videoने चाहत्यांच्या मनात उपस्थित केला प्रश्न

Virat Kohli touches Player Feet: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (ICC Champions Trophy 2025)  ग्रुप अ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यात रविवारी दुबईत सामना खेळाला गेला. या सामन्यात अनेक घटना घडल्या. पण एक गोष्ट अशी काही घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने असे काही केले जे आजच्या आधी क्वचितच तुम्ही पाहिले असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टार फलंदाज विराट कोहलीने एका खेळाडूच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. चाल जाणून घेऊयात नक्की काय झालं? आणि विराट कोणाच्या पाया पडला. 

विराट 'या' दिग्गजाचे पाय स्पर्श करण्यासाठी धावला

विराटच्या या कृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर  न्यूझीलंडविरुद्ध केन विल्यमसनची दमदार विकेट घेतली. अक्षरने ही विकेट घेताच विराट कोहली त्याच्या पायांना स्पर्श करण्यासाठी धावला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 250 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केन विल्यमसनने दुसऱ्या डावात 120 चेंडूत 81 धावा केल्या, पण तरीसुद्धा शेवटी न्यूझीलंडने हा सामना 44 धावांनी गमावला.

हे ही वाचा: Video: हिटमॅनच्या मुलाला पहिले का? पहिली झलक झाली Viral, सामन्यादरम्यान अनुष्कासोबत दिसला खेळताना

 

हे ही वाचा: "भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ

 

अक्षरने केले विल्यमसनला बाद 

सामन्यात सातत्याने विकेट पडल्यामुळे केन विल्यमसनवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला. या दबावामुळे आणि अक्षरच्या दमदार गोलंदाजीमुळे  डावाच्या 41व्या षटकात त्याने शेवटच्या चेंडूवर त्याला बाद केले. अक्षरचा तो मिडल आणि ऑफवर आर्म बॉल होता. त्यावर केन विल्यमसनने क्रीजमधून बाहेर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची विकेट पडलीच. केन विल्यमसन ८१ धावा करून बाद झाला आणि भारताला मोठी विकेट मिळाली.

हे ही वाचा: S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य

अक्षर पटेलने केली दमदार गोलंदाजी

केन विल्यमसनची विकेट पडल्यानंतर विराट कोहली थेट अक्षर पटेलकडे गेला आणि एवढी मोठी विकेट काढल्यामुळे त्याच्या पायाला स्पर्श करू लागला. त्यावर अक्षर पटेलने त्याला थांबवले आणि छान दोघेही हसले. अक्षर पटेलने 3.20 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. अक्षर पटेलने 10 षटकात 32 धावा देत 1 बळी घेतला. अक्षर पटेलनेही शानदार फलंदाजी केली, तेव्हा भारताची धावसंख्या 30/3 होती. 

Read More