Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO : विराटच्या टीमने 'या' खेळाडूच्या घरी मारला बिरयानीवर ताव

सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडिओ व्हायरल 

VIDEO : विराटच्या टीमने 'या' खेळाडूच्या घरी मारला बिरयानीवर ताव

मुंबई : सोमवारी रॉय चॅलेंजर्स बंगलौरच्या संघाला मुकाबला हा सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना हैदराबादच्या उप्पल स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या अगोदर कोहली आणि त्याच्या संपूर्ण संघाने एकत्र एका खेळाडूच्या घरी विशेष उपस्थिती लावली आणि यावेळी सर्व खेळाडूंनी बिरयानीचा मनमुराद आनंद लुटला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कॅप्टन विराट कोहली देखील बिरयानीवर ताव मारताना दिसत आहे. 

 

@virat.kohli at Mohammed Siraj Home  #ViratKohli

A post shared by Virat Kohli 2.0  (@_captain_kohli_lovers) on

या खेळाडूच्या घरी पोहोचला संघ

हैदराबादच्या विरूद्ध खेळण्या अगोदर विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी आपला साथीदार मोहम्मद सिराजच्या घरी भेट दिली. यावेळी या संपूर्ण संघाने एकत्र डिनर केलं आणि बिरयानीवर जोरदार ताव मारला आहे. रविवारी प्रॅक्टिस सेशन पूर्ण झाल्यानंतर टीम सिराजच्या घरी गेली. खेळाडूंनी सिराजच्या घरी तब्बल 2 तास घालवले आणि मनमुराद बिरयानी खाल्ली. 

टीम खेळाडूच्या घरी अशी वावरली

सिराजच्या घरी या संघाने तब्बल 2 तास घालवले. अगदी जमिनीवर बसून विराट कोहली आणि संघाने बिरयानीचा आनंद लुटला. मोहम्मद सिराजचे वडिल हे रिक्षाचालक आहेत. बंगलोरच्या संघाने सिराजला 1 करोड रुपयांमध्ये आपल्या संघात विकत घेतलं आहे. बंगलोरच्या अगोदर सिराज आयपीएलमध्ये हैदराबाद या संघात खेळत होता. 

Read More