Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

थँक्यू रोहित! मुंबईमुळे बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट मिळाल्यानंतर Virat Kohli चं ट्विट व्हायरल

आता एलिमिनेटर सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. 

थँक्यू रोहित! मुंबईमुळे बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट मिळाल्यानंतर Virat Kohli चं ट्विट व्हायरल

मुंबई : मुंबई इंडियन्सने  कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईच्या विजयामुळे दिल्लीचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेऑफचा मार्ग सोपा झाला असून प्लेऑफमध्ये जाणारी ती चौथी टीम आहे. दरम्यान आरसीबीची चाहते आणि टीम मुंबई इंडियन्सच्या विजयाकडे डोळे लावून होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

रोहितने केली कोहलीची मदत

आता एलिमिनेटर सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. आरसीबीच्या टीमने लीग सामन्यात चांगला खेळ केला. मात्र कामगिरीत सातत्य नसल्याने त्यांचं प्लेऑफचं समीकरण इतर टीमच्या सामन्यांवर अवलंबून राहिलं. यावेळी विराट कोहलीला रोहित शर्माची पूर्ण मदत हवी होती आणि रोहितने देखील आपलं काम दाखवून दिलं.

विराट कोहलींचं ट्विट व्हायरल

दरम्यान कालच्या या सामन्यानंतर विराट कोहलीचं एक ट्विट पुन्हा व्हायरल होताना दिसतंय. हे ट्विट 6 नोव्हेंबर 2019 चं आहे. त्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माला 'थँक्स रोहित' असं म्हटलंय. आता या ट्विटवर चाहत्यांनी यावरून अनेक प्रतिक्रिया दिल्यात, त्यामुळे ते व्हायरल झालं आहे.

मुळात विराट कोहलीचा वाढदिवस होता आणि रोहित शर्माने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. याला रिप्लाय म्हणून विराट कोहली रोहित शर्माला म्हणाला - 'धन्यवाद रोहित' असं म्हणाला होता. मात्र चाहते याचा संबंध आता मुंबईच्या विजयाने बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट मिळालंय, याच्याशी जोडला जातंय.

Read More