Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

W, W, W, W, W, W... 6 चेंडूत 6 विकेट्सचा चमत्कार! 'या' संघाच्या गोलंदाजांनी पसरवली दहशत

6 Wickets in 6 Balls: क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही अनेक असे विक्रम बघितले असतील ज्याचा आपण कधी विचारही करू शकत नाही.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्काराबद्दल सांगणार आहोत ज्यावर विश्वास ठेवणे कोणालाही कठीण जाईल.   

 W, W, W, W, W, W... 6 चेंडूत 6 विकेट्सचा चमत्कार! 'या' संघाच्या गोलंदाजांनी पसरवली दहशत

Unique Cricket Record: क्रिकेटच्या इतिहासात तुम्ही अनेक विचित्र रेकॉर्ड्स पाहिले असतील.  क्रिकेटमध्ये असं काही घडलं की विश्वास बसत नाही. पण जे लंकाशायरच्या गोलंदाजांनी करून दाखवलं, ते खरंच एखाद्या स्वप्नासारखं वाटतं. एकाच ओव्हरमध्ये 6 विकेट्स अशा प्रकारचं दृश्य क्रिकेट इतिहासात फारच कमी वेळा पाहायला मिळालंय. लंकाशायरच्या गोलंदाजांनी दोन दिवसांत विरोधी संघात अक्षरशः थरकाप उडवला.

पहिल्या दिवशी सुरुवात ‘हॅटट्रिक’ने

4 जुलैला लंकाशायरने नॉर्थँप्टनशायर विरुद्ध T-20 सामना खेळला. या सामन्यात लँकशायरच्या गोलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत सलग चार विकेट्स घेतल्या. यात साकिब महमूदने घेतलेली जबरदस्त हॅटट्रिक सगळ्यांचे लक्ष वेधून गेली.

हे ही वाचा: Asia Cup 2025 रद्द होणार? भारत आणि श्रीलंकेच्या 'या' निर्णयाने उडाली खळबळ

 

पण खरी कमाल झाली दुसऱ्या दिवशी

पुढच्या दिवशी म्हणजे 5 जुलैला लंकाशायरचा सामना डर्बिशायरशी झाला. सामन्याची सुरुवातच दोन विकेट्सने झाली आणि या दोन्ही विकेट्स घेतल्या मार्क वुडने. म्हणजेच, लंकाशायरने दोन दिवसांत सलग 6 चेंडूंमध्ये 5 विकेट्स त्याने घेतल्या. हे खरं तर क्रिकेटच्या इतिहासातील एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. अशा कामगिरीने विरोधी संघांमध्ये खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा: iPhone, पैसे आणि फसवणूक? यश दयालने शेवटी मौन सोडलं, यौन शोषणाच्या आरोपावर दिलं स्पष्ट उत्तर

 

साल्ट आणि बटलरने केली धुलाई

या ऐतिहासिक विजयात लंकाशायरच्या फलंदाजांनीही धमाका केला. डर्बिशायरविरुद्धच्या सामन्यात फिल साल्टने 57 चेंडूंमध्ये 80 धावांची तुफानी खेळी केली.  यामध्ये 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. तर जोस बटलरने 42 चेंडूंमध्ये 54 धावा करत डाव सावरला. या खेळीच्या जोरावर लंकाशायरने 5 विकेट्स राखून विजय मिळवला.

हे ही वाचा: 'या' दिवसापासून सुरु होणार कबड्डीचा थरार! PKL SEASON 12 च्या तारखा जाहीर

 

लंकाशायरचा डंका वाजतोय!

सलग दोन सामन्यांमध्ये गोलंदाजांनी एकीकडे विरोधी संघाचा विध्वंस केला, तर दुसरीकडे फलंदाजांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं. अशा कामगिरीमुळे लंकाशायर सध्या T-20 लीगमधील सर्वाधिक धोकादायक संघांपैकी एक ठरत आहे.

Read More