Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कपडे धुवावे लागत आहेत म्हणून 'गब्बर' म्हणतोय 'आसू बहा रहा हूँ...'

शिखरला रडूही येत आहे

कपडे धुवावे लागत आहेत म्हणून 'गब्बर' म्हणतोय 'आसू बहा रहा हूँ...'

मुंबई : मंगळवारपासून पंतप्रधानं नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन होणार असल्याचीशय महत्त्वाची घोषणा केली. ज्यानंतर किंबहुना याधीपासून म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यापासून अनेकांनीच सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरात राहण्यालाच प्राधान्य दिलं होतं. अगदी सेलिब्रिटी मंडळीसुद्धा याला अपवाद ठरले नाहीत. याच सेलिब्रिटी मंडळींपैकी एक म्हणजे, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शिखर धवन. 

संघातील सलामीवीर म्हणून क्रिकेटच्या मैदानात येत विरोधी संघातील गोलंदाजांना चांगलाच दणका देणाऱ्या या 'गब्बर'ला चक्क त्याच्या पत्नीनेच दणका दिला आहे. ज्यामुळे शिखरला रडूही येत आहे. पण, करणार काय; आता यावर पर्याय नाही. 

कोरोना व्हायरसमुळे क्वारंटाईऩ ब्रेकवर असणाऱ्या शिखरला त्याच्या पत्नीने चक्क घराचं स्वच्छतागृह आणि कपडे धुण्याचं काम दिलं आहे. आता 'होम मिनिस्टर'च्या हद्दीत असल्यावर त्यांचा शब्द न जुमानता पुढे जाणं हे जिथे कोणालाच शक्य झालेलं नाही त्यातच शिखरही काही वेगळा नाही. 

 

कारण, जिथे शिखरची पत्नी मेकअप करण्यामध्ये आणि मैत्रीणींशी फोनवर गप्पा मारण्यामधये व्यग्र आहे तिथेच शिखरला मात्र घरातली काही मेहनतीची कामं करावी लागत आहेत. हेच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. 'एक आठवडा घरी राहिल्यानंतरचं आयुष्य.... खरंच हे वास्तव बोचरं आहे', असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला लिहिलं आहे. अतिशय विनोदी अंदाजाच शिखरने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं असून, काहींनी त्याच्या या व्हिडिओवर कमेंटही केली आहे. 

 

Read More