Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तुमच्याकडे साधं प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळलेला...', अजय जडेजाने प्रश्न विचारताच वसीम अक्रमने दाखवला आरसा, 'तुम्हाला कशाला...'

पीटीआयच्या एका वृत्तानुसार, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (Champions Trophy) पाकिस्तानचे अंतरिम प्रशिक्षक अकिब जावेद (Aquib Javed) आणि इतर प्रशिक्षकांची हकालपट्टी केली जाणार आहे.   

'तुमच्याकडे साधं प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळलेला...', अजय जडेजाने प्रश्न विचारताच वसीम अक्रमने दाखवला आरसा, 'तुम्हाला कशाला...'

Champions Trophy 2025: सध्या चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु असून, सर्वाधिक चर्चा पाकिस्तान संघाची आहे. पण ही चर्चा होण्यामागे सकारात्मक नव्हे तर नकारात्मक कारणं आहेत. यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान संघावर पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. पाकिस्तान संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीतून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील संघासह निवडकर्ते, पीसीबी अधिकारी सर्वजण निशाण्यावर आहेत. यानिमित्ताने प्रत्येकाच्या कामगिरीची छाननी केली जात आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानला पराभूत केलं. पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (Champions Trophy) पाकिस्तानचे अंतरिम प्रशिक्षक अकिब जावेद (Aquib Javed) आणि इतर प्रशिक्षकांची हकालपट्टी केली जाणार आहे. 

यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तान संघाच्या निवड समितीसंदर्भात एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. वसीम अक्रमसह या कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेटर अजय जडेजा आणि निखिल चोप्राही उपस्थित होते. 

अजय जडेजाने कार्यक्रमात वसीम अक्रमला विचारलं की, "तुमच्या येथे निवडकर्त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेलं असं अनिवार्य नाही का?". यानंतर निखील चोप्रा म्हणतो की, "किमान त्यांनी कमीत कमी सामने खेळायला हवेत". त्यावर अजय जडेजा म्हणतो की, "तुम्ही मला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहात का की पाकिस्तानमधील एका राष्ट्रीय निवडकर्त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटही खेळलेले नाही?".

यानंतर वसीम अक्रम त्यावर उत्तर देताना काही आश्चर्यकारक खुलासे करतो. "एक निवडकर्ता होता, जो नोकरशहा होता आणि सुमारे सहा महिन्यांपूर्वीपर्यंत निवड समितीचा भाग होता. आता एक अम्पायर आहे, पण तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. एक माणूस आहे जो आकडेवारीत तज्ज्ञ आहे. म्हणजे तुम्हाला आकडेवारीतील तज्ज्ञ का हवा आहे? तुम्ही जमिनीवर संगणक ठेवून खेळाल का?", असं उत्तर वसीम अक्रमने दिलं.

ऑक्टोबर 2024 मध्ये इंग्लंडविरोधातीलल पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अम्पायर अलीम दार, आकिब जावेद आणि अझर अली यांना निवड समितीत समाविष्ट केलं. याआधी क्रीडा पत्रकार आणि पीएसएल संघ व्यवस्थापक असद शफीक आणि हसन चीमा यांचा समावेश होता.

"जर तुम्ही आकडेवारीच्या आधारे खेळाडूची निवड करत असाल तर त मग तुम्ही निवडत नाही तर नाकारत आहात. तुम्ही कशाप्रकारे त्यांच्यासोबत काम करु शकता हे पाहणं निवडकर्त्यांचं काम आहे. जेव्हा तुमची किंवा माझी निवड झाली तेव्हा आपली आकडेवारी जगातील सर्वोत्तम नव्हती. तुम्हाला एखाद्या खेळाडूला पाहिल्यानंतर हा खेळाडू पुढील काही महिन्यात चांगली कामगिरी करु शकतो असं वाटतं, तेव्हा निवडकर्ताच ते करु शकतो. आकडेवारी तुम्हाला या गोष्टी सांगत नाहीत," असं मत जडेजाने यावेळी मांडलं.

वसीम अक्रमही या मताशी सहमती दर्शवतो आणि सांगतो की, "आकडेवारी तुम्हाला परिस्थिती सांगू शकत नाहीत. मैदानातील सत्य स्थिती त्याआधारे ठरवू शकत नाही".

चॅम्पिअन्स ट्रॉफीत अ गटातून भारत आणि न्यूझीलंड सेमी-फायनलसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघाचा एक सामना अद्याप शिल्लक आहे. 2 मार्चला भारत-पाकिस्तान भिडणार आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान या गटातून बाहेर पडले आहेत.

Read More