Champions Trophy 2025: पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज वसीम अक्रमने युवा स्पिनर अबरार अहमदला घरचा आहेर दिला आहे. अबरार अहमदने 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिलला आऊट केल्यानंतर भरपूर अग्रेसिव सेलिब्रेशन केलं होतं. याची चर्चा सगळीकडेच झाली. यावर वसीम अक्रमने अबरारला चांगलच फटकारलं आहे.
अक्रमने म्हटलं की, जेव्हा तुमचा संघ संकटात असेल तेव्हा तुम्ही विनम्रतेने वागले पाहिजे. अशावेळी चुकीचे वर्तन योग्य नाही. अबरार अहमदने शुभमन गिलला चांगल्या पद्धतीने बोल्ड केलं. मात्र यानंतर गिल तंबूत परतताना अबरारने इशारा करत आनंद साजरा केला. त्याची ही कृती अनेक दिग्गजांना आवडली नाही. अक्रमने यावर अबरारला घरचा आहेर दिला. तो म्हणाला की, 'तुमचा संघ सुस्थितीत असेल तर अशा पद्धतीने सेलिब्रेशन करणे योग्य आहे. पण जेव्हा संघ विजयासाठी संघर्ष करत असेल तेव्हा असं वागणं योग्य नाही.'
.The reaction of Abrar Ahmed.
— Colonel Mayank Chaubey (@col_chaubey) February 24, 2025
A third rate reaction by a person of same rating.
How do you classify it? Please comment.#IndiavsPakistan #ChampionsTrophy #ChampionsTrophy2025 #ICCChampionsTrophy #iccchampionstrophy2025 #Cricket #CricketTwitter pic.twitter.com/zwpqweKnJg
या घटनेनंतर अबरार अहमदने त्याच्या वागण्याबद्दल चाहत्यांची माफी मागितली आहे. तो म्हणाला की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा हेतू नव्हता आणि भविष्यात आनंद साजरा करण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवेल.
त्याच वेळी, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 241 धावा केल्या. भारताने हे लक्ष्य 42.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले.
विराट कोहलीने नाबाद 100 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान, कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14000 धावा पूर्ण केल्या आणि त्याचे 51 वे शतकही केले. या विजयासह, भारत अ गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत.