Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO : धोनीच्या विविधभाषी प्रश्नांना लेकीने दिलेली उत्तरं पाहा...

सहा भाषांमध्ये झिवा धोनीच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. 

VIDEO : धोनीच्या विविधभाषी प्रश्नांना लेकीने दिलेली उत्तरं पाहा...

मुंबई : आयपीएलच्या रणसंग्रामाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असताना क्रीडा रसिकांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला आहे. अशाच उत्साही वातावरणात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईच्या संघाने विजय मइळवत मोठ्य़ा दणक्यात यंदाच्या आयपीएलच्या हंगामाची सुरुवात केली आहे. या विजयाने चेन्नईच्या संघाने सर्वांचं लक्ष वेधलं आहेत. पण, या संघाला पाठिंबा देणाऱ्या सर्वात लहान चिमुरडीने म्हणजेच धोनीची लेक झिवा हिनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. झिवाचे अनेक व्हिडिओ स्वत:धोनी आणि त्याची पत्नी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आताही असाच एक व्हिडिओ धोनीने पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याची मुलगी झिवा, ही सहा विविध भाषांमध्ये बोलताना दिसत आहे. 

तू कशी आहेस? हा एक प्रश्न धोनी झिवाला तमिळ, बंगाली, गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि उर्दू अशा भाषांमध्ये विचारत आहे. आपल्या वडिलांच्या या प्रश्नांची उत्तरं देत झिवाही अगदी सुरेखपणे आणि तितक्याच सराईतपणे उत्तरं देत असताना पाहायला मिळत आहे. 'केम छो....' असं विचारल्यावर 'मजामा' असं उत्तर देणारी झिवा सध्या नेटकऱ्यांची दाद मिळवत आहे. 

 
 
 
 

फक्त हाच व्हिडिओ नव्हे, तर यापूर्वीही झिवाचे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ती कधी दाक्षिणात्य भाषेतील श्लोक म्हणताना दिसते, कधी अभ्यासाचे धडे गिरवताना दिसते तर कधी आपल्या वडिलांसोबत ठेका धरताना दिसते. वर्षभर विविध ठिकाणी असणाऱ्या क्रिकेट दौऱ्यांमधून उसंत मिळाल्यावर धोनी नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याला अर्थात त्याच्या कुटुंबाला प्राधान्य देत त्यांच्यासोबत शक्य तितका वेळ व्यतीत करतो. हा व्हिडिओही त्याचच एक उदाहरण ठरत आहे. 

Read More