Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WCL 2025: टीम इंडियाने शाहिद आफ्रिदीची बोलती केली बंद, बाल्कनीत तोंड पाडून बसला Video

WCL 2025:  बुधवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 चा सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार होता. मात्र भारतीय संघाने ग्रुप स्टेज प्रमाणे या सामन्याबाबत सुद्धा मोठा निर्णय घेऊन स्पर्धेतून माघार घेतली आहे.   

WCL 2025: टीम इंडियाने शाहिद आफ्रिदीची बोलती केली बंद, बाल्कनीत तोंड पाडून बसला Video

WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये 30 जुलै रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार होता. मात्र पहलगाम हल्ल्याच्या पाश्ववभूमीवर पाकिस्तान विरुद्ध सेमी फायनल सामना खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला. त्यानंतर आता भारताने अधिकृतपणे स्पर्धेतून माघार घेतली. परिणामी पाकिस्तान आता वर्ल्ड चैंपियंस ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. भारताने माघार घेण्यापूर्वी आफ्रिदीने टीम इंडिया (Team India) सोबत सेमी फायनल सामना खेळण्याबाबत टीका केली होती. पण भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेत असं उत्तर दिलं, ज्यामुळे त्याची बोलती बंद झाली. टीम इंडिया सामना सोडून मैदानाबाहेर जाताना पाहून आफ्रिदी ( Shahid Afridi) बाल्कनीत तोंड पाडून बसलेला दिसला. टीम इंडिया पाकिस्तानशी खेळण्याऐवजी स्पर्धा सोडून जाण्याचा एवढा मोठा निर्णय घेऊ शकते याचा पाकिस्तानला अजिबात अंदाज नव्हता. 

काय म्हणाला होता शाहिद आफ्रिदी?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 चा सेमी फायनल सामना 30 जुलै रोजी खेळवला जाणार होता. मात्र त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. शाहिद आफ्रिदीने पत्रकार परिषदेत म्हटले की, 'माहित नाही भारत आता आमच्या विरुद्ध कोणत्या तोंडाने खेळणार? पण त्यांना आता आमच्या सोबतच खेळावं लागणार'. शाहिद आफ्रिदीने हे वक्तव्य यामुळे केलं होतं कारण ग्रुप स्टेज सामन्यात भारताने पाकिस्तान विरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकला होता. पण सेमी फायनलचा सामना असल्याने भारत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध सामना काहीही करून खेळणार असं आफ्रिदीला वाटत होतं. पण भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यापेक्षा स्पर्धेतून माघार घेणं पत्करलं. 

टीम इंडियाने मैदानात सोडलं : 

भारताने सामन्यातून माघार घेतल्यानंतर वरिष्ठ खेळाडू युवराज सिंग, सुरेश रैना, शिखर धवन आणि इतर संघ सदस्य स्टेडियममधून बाहेर पडले. तर पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदी बाल्कनीतून हे सगळं पाहत होता आणि हताश दिसत होता. 

पाहा व्हिडीओ : 

हेही वाचा : रवींद्र जडेजाच्या बहिणीने केली मोठी मागणी, सरकारकडून भावाला 'हा' सन्मान देण्याची व्यक्त केली इच्छा

स्पॉन्सरने सुद्धा घेतली होती माघार : 

31 जुलै रोजी एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमीफायनल सामना होणार होता. परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी, भारतीय संघाच्या स्पॉन्सरपैकी एक, EaseMyTrip ने दहशतवाद आणि क्रिकेट हातात हात घालून चालू शकत नाही असे सांगून उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली. एक्स या सोशल मीडियावर कंपनीने जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटले की, कंपनीचे संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले की,  वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल ते इंडिया चॅम्पियन्सचे कौतुक करतात, परंतु पाकिस्तानचा सहभाग असलेल्या सामन्यांशी स्पॉन्सर म्हणून ते जोडले जाऊ इच्छित नाहीत.

वरिष्ठ खेळाडूंनी घेतली होती भूमिका : 

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 या स्पर्धेच्या सुरुवातीला, अनेक खेळाडूंनी सामन्यातून माघार घेतल्याने भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धचा ग्रुप स्टेज सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. शिखर धवन आणि हरभजन सिंग हे प्रमुख खेळाडू होते ज्यांनी हा पाकिस्तान विरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकला होता. 

Read More