Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द! मॅच खेळायला खेळाडूंचा नकार

WCL England 2025 called off India vs Pakistan match : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आज 20 जुलैला होणार सामना रद्द झाला असून टीम इंडियाच्या 5 खेळाडूंनी आपली नावे मागे घेतल्यामुळे, टीम इंडियाचा प्लेइंग 11 देखील तयार होत नाहीये.  

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना रद्द! मॅच खेळायला खेळाडूंचा नकार

India vs Pakistan Match: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता रद्द झाला आहे. आज, 20 जुलैला बर्मिंघममध्ये हा सामना होणार होता, पण भारतीय संघातील 5 प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची अंतिम अकरा खेळाडूंची टीमच तयार होऊ शकत नाहीये.

भारत-पाकिस्तान क्रिकेटवर पुन्हा राजकीय वादळ

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली. त्याचा परिणाम थेट या स्पर्धेवर झाला. सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली, आणि त्यांच्यावर सामना न खेळण्याचा दबावही वाढला. याच पार्श्वभूमीवर हरभजन सिंह, इरफान पठान, युसूफ पठान, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे 15 जणांच्या भारतीय संघात आता फक्त 10 खेळाडू उरलेत. अकरा खेळाडूंची टीमच उभी राहू शकत नसल्यामुळे सामना रद्द करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

 

 

 

WCL चं स्पष्टीकरण

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सकडून (WCL) एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील नियोजित क्रिकेट सामना रद्द करण्यात आला आहे. WCL च्या वतीने सांगण्यात आलं की, "आम्ही नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी चांगले आणि आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील हॉकी, व्हॉलीबॉलसारखे काही सामने नुकतेच झाले. यंदाही पाकिस्तानची हॉकी टीम भारतात अली, हे पाहून आम्ही क्रिकेटमध्येही या दोन देशांमधील सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. आमचा हेतू फक्त जगभरातील चाहत्यांसाठी काही चांगल्या आठवणी तयार करण्याचा होता. मात्र, या निर्णयामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. विशेषतः भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू, ज्यांनी देशासाठी मोठी कामगिरी केली आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. याशिवाय, आमच्या सोबत असलेल्या ब्रँड्सवरही याचा परिणाम झाला. त्यांच्या निखळ क्रीडाप्रेमामुळे त्यांनी आमच्याशी साथ दिली होती, पण या सर्व घडामोडींनी त्यांनाही अडचणीत आणले. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की भारत-पाकिस्तान सामन्याला स्थगित करण्यात येईल."

"आम्ही पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. आमचा उद्देश कधीच कोणाला दुखावण्याचा नव्हता. आम्ही केवळ क्रिकेटप्रेमींना काही आनंदाचे क्षण द्यावेत, इतकाच विचार केला होता." अशी पोस्ट करत  WCL ने स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

 

भारतीय आणि पाकिस्तानी संघावर एक नजर

इंडिया चॅम्पियन्स:
युवराज सिंग, शिखर धवन (नाव मागे घेतले), हरभजन सिंह (नाव मागे घेतले), सुरेश रैना (नाव मागे घेतले), इरफान पठान (नाव मागे घेतले), युसूफ पठान (नाव मागे घेतले), रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, पीयूष चावला, स्टुअर्ट बिन्नी, वरुण आरोन, विनय कुमार, अभिमन्यु मिथुन, सिद्धार्थ कौल, गुरकीरत मान.

पाकिस्तान चॅम्पियन्स:
मोहम्मद हफीज, शोएब मलिक, सरफराज अहमद, शरजील खान, वहाब रियाज, आसिफ अली, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल, आमेर यामीन, सोहेल खान, सोहेल तनवीर.

Read More