Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Video : चांगला खेळलास म्हात्रे! MI VS CSK मॅचनंतर रोहित शर्माने 17 वर्षांच्या फलंदाजाला दिली शाबासकी

MI VS CSK :  सामन्यात 17 वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रे याने चेन्नई सुपरकिंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. सामना संपल्यावर रोहित शर्माने आयुषचे कौतुक करून त्याला शाबासकी सुद्धा दिली. 

Video : चांगला खेळलास म्हात्रे! MI VS CSK मॅचनंतर रोहित शर्माने 17 वर्षांच्या फलंदाजाला दिली शाबासकी

MI VS CSK : रविवार 20 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians VS Chennai Superkings) यांच्यात आयपीएल 2025 चा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सवर 9 विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यात 17 वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याने चेन्नई सुपरकिंग्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयुषला मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं आणि 15 बॉलमध्ये 32 धावा केल्या. या खेळीनंतर सामना संपल्यावर रोहित शर्माने (Rohit Sharma) आयुषचे कौतुक करून त्याला शाबासकी सुद्धा दिली. 

आयुषचा पदार्पणात दमदार परफॉर्मन्स : 

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकला. यासह त्यांनी चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आव्हान दिले. चेन्नई सुपरकिंग्सकडून फलंदाजीसाठी शेख रशीद आणि रचिन रवींद्र यांची जोडी उतरली. रचिन केवळ 5 धावा करून बाद झाला. तेव्हा १७ वर्षांचा आयुष म्हात्रे हा फलंदाजीसाठी मैदानात आला. सीएसकेसाठी आयुषने 15 बॉलमध्ये 32 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या दमदार खेळीसह त्याने चेन्नई सुपरकिंग्सचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु 6.5 ओव्हरला दीपक चहरच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.  

हेही वाचा : BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 5 खेळाडूंचा पत्ता कट, एका मराठमोळ्या खेळाडूचा समावेश

 

रोहितने दिली शाबासकी : 

सामना संपल्यावर मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा आयुष म्हात्रेला रोहित शर्माकडे घेऊन आला. सूर्याने रोहितला म्हटले की आयुषला तुला भेटायचे होते. रोहित आयुषला हात मिळवत आणि शाबासकीची थाप देत म्हणाला, 'म्हात्रे चांगला खेळलास!' आम्ही रणजी ट्रॉफीमध्ये एकत्र खेळलो होतो असा उललकेह सुद्धा रोहितने केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कोण आहे आयुष म्हात्रे?

युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा रहिवासी असून तो सध्या 17 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये आयुष म्हात्रेने स्वतःला 30 लाखांच्या किंमतीवर लिस्ट केले होते. परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केली नाही. आयुष म्हात्रेने 9 फस्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांत 504 धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

Read More