West Indies Champions to wear Gold Embroidered Jersey: क्रिस गेल, डीजे ब्रावो, किरोन पोलार्ड यांसारख्या वेस्ट इंडिजच्या दिग्गजांनी सजलेला 'वेस्ट इंडिज चॅम्पियन्स' संघ यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL 2025) मध्ये इतिहास घडवणार आहे. कारण, या संघाने क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी आणि खास जर्सी सादर केली आहे. विशेष म्हणजे या जर्सीमध्ये 18 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज चॅम्पियन्सची ही जर्सी फक्त देखाव्यासाठी नाही, तर त्यामागे वेस्ट इंडिज क्रिकेटच्या महान परंपरेला मानाचा मुजरा करण्याचा उद्देश आहे. या जर्सीचे वजन वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये आहे. ३० ग्रॅम, २० ग्रॅम आणि १० ग्रॅम अशा वेगवेगळे व्हर्जनची जर्सी आहे. सर क्लाइव्ह लॉयड पासून ते क्रिस गेलपर्यंत वेस्ट इंडिजच्या दिग्गजांना ही एक आगळीवेगळा सलाम ठरणार आहे.
हे ही वाचा: विराट कोहली पुन्हा टेस्ट मैदानात उतरणार? निवृत्तीचा निर्णय मागे घेत टीम इंडियाच्या मदतीला येणार धाऊन?
वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाचे चेअरमन अजय सेठी म्हणाले, "आमच्या संघात दिग्गज खेळाडू आहेत. ही जर्सी वेस्ट इंडिज क्रिकेटच्या महान खेळाडूंना समर्पित आहे. डब्ल्यूसीएल हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट टूर्नामेंट्सपैकी एक आहे. यंदा आमचा हेतू ट्रॉफी जिंकण्याचा आहे."
हे ही वाचा: IND vs ENG: ना नायर, ना अय्यर... 'हा' फलंदाज आहे नंबर-3 चा खरा दावेदार!
क्रिस गेल (कर्णधार), किरोन पोलार्ड, ड्वेन ब्रावो, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, शेल्डन कॉटरेल, शिवनारायण चंद्रपॉल, चाडविक वॉल्टन, शॅनन गॅब्रिएल, अॅशली नर्स, फिडेल एडवर्ड्स, विलियम पर्किन्स, सुलेमान बेन, डेव मोहम्मद, निकिता मिलर
WI cricket in a different world
For WCL 2, "West Indies Champions" team sport the most expensive cricket jersey ever!
It is crafted by UAE-based Lorenze with 30g of real 18K gold. pic.twitter.com/R0eiVm47ie
— Kausthub Gudipati (@kaustats) July 18, 2025
या स्पर्धेत क्रिकेटचे दिग्गज पुन्हा एकदा मैदानावर बॅट-बॉल हातात घेऊन उतरतील. युवराज सिंग, हरभजन सिंग, शिखर धवन, सुरेश रैना, ब्रेट ली, क्रिस लिन, शॉन मार्श, इयॉन मॉर्गन, मोईन अली, सर अॅलेस्टेअर कुक, एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, क्रिस मॉरिस आणि वेन पार्नेल यांसारखे खेळाडू यंदाच्या स्पर्धेत दिसणार आहेत.
ही स्पर्धा १८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडच्या बर्मिंगहॅम, नॉर्थहॅम्पटन, लीसेस्टर आणि लीड्स येथे होणार आहे. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या स्पर्धेला अधिकृत मान्यता दिली आहे. भारतातील प्रेक्षकांना हे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स आणि फॅन कोडवर रोज सायंकाळी ५ आणि रात्री ९ वाजता (डबल हेडर) थेट पाहता येतील.
तारीख सामना वेळ
18 जुलै इंग्लंड vs पाकिस्तान रात्री 9 वाजता
19 जुलै वेस्ट इंडिज vs दक्षिण आफ्रिका सायंकाळी 5 वाजता
19 जुलै इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया रात्री 9 वाजता
20 जुलै भारत vs पाकिस्तान रात्री 9 वाजता
22 जुलै भारत vs दक्षिण आफ्रिका सायंकाळी 5 वाजता
22 जुलै इंग्लंड vs वेस्ट इंडिज रात्री 9 वाजता
23 जुलै ऑस्ट्रेलिया vs वेस्ट इंडिज रात्री 9 वाजता
24 जुलै इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका रात्री 9 वाजता
25 जुलै पाकिस्तान vs दक्षिण आफ्रिका रात्री 9 वाजता
26 जुलै भारत vs ऑस्ट्रेलिया सायंकाळी 5 वाजता
26 जुलै पाकिस्तान vs वेस्ट इंडिज रात्री 9 वाजता
27 जुलै दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया सायंकाळी 5 वाजता
27 जुलै भारत vs इंग्लंड रात्री 9 वाजता
29 जुलै ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान सायंकाळी 5 वाजता
29 जुलै भारत vs वेस्ट इंडिज रात्री 9 वाजता
31 जुलै सेमीफायनल 1 vs सेमीफायनल 4 सायंकाळी 5 वाजता
31 जुलै सेमीफायनल 2 vs सेमीफायनल 3 रात्री 9 वाजता
2 ऑगस्ट अंतिम सामना (एजबस्टन) रात्री 9 वाजता
यंदाचा डब्ल्यूसीएल फक्त क्रिकेटचा उत्सव नाही, तर त्यात लक्झरीची झळाळीही आहे. वेस्ट इंडिज चॅम्पियन्सची सोन्याची जर्सी याचीच साक्ष देणार आहे.