Andre Russell Retirement : वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेट आंद्रे रसेल (Andre Russell) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो वेस्ट इंडीजसाठी शेवटचा खेळताना दिसेल. आंद्रे रसेलन 37 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.
29 एप्रिल 1988 मध्ये किंग्सटन, जमैकामध्ये आंद्रे रसेलचा जन्म झाला. तेव्हा त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब झाली. त्याच्या आईला वाटत होतं की मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं आणि नोकरी करावी. पण आंद्रे रसेलला माहित होतं की, जर त्यांना स्वतः आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारायची असेल तर त्याला एक यशस्वी क्रिकेटर बनाव लागेल.
आंद्रे रसेलचे वडील माइकल एका फॅक्ट्रीमध्ये मजुरी करायचे. त्याची आई सॅड्रा डेविसला नको हवं होतं की तिच्या मुलाने क्रिकेटर व्हावं. लेकिन रसेलने आपल्या आईकडे दोन वर्षाचा वेळ मागितला. तो म्हणाला आई मला फक्त दोन वर्ष दे यात मी जर काही करू शकलो नाही तर मी तेच करेन जे तू मला सांगशील.
हेही वाचा : मँचेस्टरमध्ये 'या' गोलंदाजांना मैदानात उतरवलं तर भारताचा विजय पक्का!
आंद्रे रसेल आपल्या आईला सांगितल्या प्रमाणे यशस्वी झाला नाही पण त्याच्या कुटुंबाला समजलं की तो मेहनत करतोय आणि एक दिवस नक्कीच यशस्वी होईल. 2007 मध्ये जमैकच्या संघाकडून पहिल्यांदाच फर्स्ट क्लास क्रिकेट खेळून रसेलने सिलेक्टर्सचं मन जिंकलं. खतरनाक फलंदाज आणि घातक गोलंदाज म्हणून त्याने वेस्ट इंडिजच्या संघात स्थान मिळवलं. त्याने नोव्हेंबर 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
क्रिकेटमध्ये यशस्वी झाल्यावर आंद्रे रसेलकडे फक्त पैसाचं नव्हता तर तिने त्या पैशांच्या जोरावर ग्लॅमर सुद्धा खेचून आणलं. मॉडेल जस्सिम लॉरा आणि आंद्रे रसेलमध्ये जवळीक वाढत गेली आणि 2014 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि 2016 मध्ये दोघांचं लग्न झालं. 2020 मध्ये दोघांना एक मुलगी झाली जिचं नाव अमाया ठेवण्यात आलं.