Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

स्टेडियमध्ये नक्की काय झालं? गौतम गंभीरने दिलं 'त्या' कृतीचं स्पष्टीकरण; पाहा Video

Gautam Gambhir Video : कोहलीचं नाव ऐकून प्रेक्षकांना गंभीरने असं कृत्य केलं, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता गंभीरने स्टेडियमवर नेमकं काय झालं? याचा खुलासा केला आहे.

स्टेडियमध्ये नक्की काय झालं? गौतम गंभीरने दिलं 'त्या' कृतीचं स्पष्टीकरण; पाहा Video

Gautam Gambhir Statement : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा समालोचक गौतम गंभीर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या झालेल्या सामन्यानंतर गौतम गंभीरला प्रेक्षकांनी डिवचलं होतं. त्यानंतर गौतीने थेट मिडल फिंगर दाखवत प्रेक्षकांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावेळी काहीजण कोहली कोहलीच्या घोषणा देत होते. त्यामुळे गंभीर चांगलाच चर्चेत आला. कोहलीचं नाव ऐकून प्रेक्षकांना  गंभीरने असं कृत्य केलं, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता गंभीरने स्टेडियमवर नेमकं काय झालं? याचा खुलासा केला आहे.

गंभीरने सांगितलं सत्य...

सत्य आपली बुटं घालेपर्यंत असत्य अर्ध्या जगाची फेरी मारून येईल, असं गंभीर म्हणतो. सर्व काही दिसते तसे नसते. आपल्या राष्ट्राविरुद्ध ज्या प्रकारच्या घोषणा दिल्या त्याबद्दल कोणताही भारतीय प्रतिक्रिया देईल. मला आमच्या खेळाडूंवर प्रेम आहे आणि मला माझ्या देशावर प्रेम आहे, असं गौतम गंभीर ट्विट करत म्हणाला आहे.

सोशल मीडियावर जे दाखवले जाते त्यात तथ्य नाही, कारण लोक त्यांना जे दाखवायचे ते दाखवतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य हे आहे की जर तुम्ही भारतविरोधी घोषणा दिल्या आणि काश्मीरबद्दल बोललात तर तुमच्या आधी मी स्पष्टपणे प्रतिक्रिया देईल. तिथं 2-3 पाकिस्तानी होते जे काश्मीरवर भारतविरोधीगोष्टी बोलत होते. त्यामुळे ती माझी स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मला माझ्या देशाविरुद्ध काहीही ऐकू येत नाही. त्यामुळे माझी ती प्रतिक्रिया होती.., असं गौतम गंभीर एएनआयशी बोलताना म्हणाला आहे.

Read More