Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

WTC Final पावसामुळे रद्द झाली तर कोणता संघ बनणार चॅम्पियन? जाणून घ्या ICC चे नियम

WTC Final 2025 :11 जून ते 15 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे.  ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) विजेतेपदासाठी फायनलमध्ये लढत आहे.

WTC Final पावसामुळे रद्द झाली तर कोणता संघ बनणार चॅम्पियन? जाणून घ्या ICC चे नियम

WTC Final 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलला बुधवार 11 जून पासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) विजेतेपदासाठी फायनलमध्ये लढत आहे. यापूर्वी 2023 ची WTC Final ऑस्ट्रेलियाने जिंकली होती, आता पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी ते फायनल खेळत असून त्यांचा सामना प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवलेल्या साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 

पावसामुळे सामना रद्द झाला तर कसा ठरणार विजेता?

11 जून ते 15 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली असून हा सामना पावसामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्तपाने विजेता घोषित करण्यात येईल. 

WTC Final मध्ये काय आहेत रिजर्व डे चे नियम : 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 16 जूनचा दिवस रिजर्व डे म्हणून ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच जर पाऊस किंवा अन्य कारणामुळे पाच दिवसांच्या खेळात बाधा निर्माण झाली तर 16 जून रोजी उर्वरित सामना खेळवला जाईल. खराब हवामानामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही तरच हा सहावा दिवस वापरला जाईल. हा दिवस सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी अतिरिक्त दिवस नाही, तर गमावलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी आहे. जर राखीव दिवसानंतरही सामना निकाली निघाला नाही, तर दोन्ही संघांना या चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेते घोषित केले जाईल. वर्ल्ड टेस्ट सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सुमारे 25 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जरी पाच दिवसांच्या खेळात थोडा वेळ वाया गेला असला तरीही एक रिजर्व डे उपलब्ध आहे. 

साऊथ आफ्रिका प्लेईंग 11 : 

एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

ऑस्ट्रेलिया प्लेईंग 11 :

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड

 

Read More