What is Anirudh Ravichander’s net worth?: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचं नाव सनरायझर्स हैदराबादच्या मालकीणबाई अर्थात CEO कव्या मारनसोबत जोडलं गेलं आहे. हे दोघं काही ठिकाणी एकत्र दिसल्यानं त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता स्वतः अनिरुद्धने या अफवांना पूर्णविराम देत स्पष्ट केलं की तो सध्या कोणाशीही लग्न करत नाही आहे. पण या चर्चांमुळे अनिरुद्ध रविचंदरची जोरदार चर्चा सुरु आहे. तो कोण आहे? त्याची संपत्ती किती? अशी माहिती लोकांना हवी आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, अनिरुद्ध रविचंदरकडे सुमारे 50 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो एका चित्रपटासाठी संगीत द्यायला 8 ते 10 कोटी रुपये घेतो, असंही सांगितलं जातं. त्याच्या लोकप्रियतेच्या आणि मागणीतल्या वाढीमुळे ही रक्कम दिवसेंदिवस वाढते आहे.
हे ही वाचा: पतौडी ट्रॉफीचे नाव बदलण्याबाबत सचिन तेंडुलकरने उचलले मोठे पाऊल, BCCI आणि ECB ला केली खास विनंती
अनिरुद्धचा जन्म आणि शिक्षण चेन्नईमध्ये झालं. त्याने लोयोला कॉलेजमधून पदवी घेतली असून, लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक मधून पियानो शिकला आहे. त्याच्याकडे साउंड इंजिनिअरिंग डिप्लोमाही आहे. त्याचा फिल्मी डेब्यू 2012 मध्ये झाला, तेव्हा त्याने धनुषच्या ‘3’ या सिनेमाला संगीत दिलं. या चित्रपटातील ‘Why This Kolaveri Di’ हे गाणं प्रचंड हिट झालं आणि त्यानं एकाच झटक्यात स्टारडम मिळवलं. हे गाणं ‘टँग्लिश’ (तमिळ + इंग्रजी) भाषेमुळे विशेष गाजलं.
अनिरुद्धने नंतर अनेक सुपरहिट प्रोजेक्ट्सवर काम केलं. कथ्थी, वेलैयिल्ला पट्टाधारी, काकी सट्टई यांसारख्या सिनेमांमध्ये त्याचं संगीत विशेष गाजलं. आजवर त्याने रजनीकांत, कमल हासन, शाहरुख खान, अजित कुमार, सूर्या, पवन कल्याण, नानी यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे.
अनिरुद्धचा शेवटचा प्रोजेक्ट ‘विडामुइयर्ची’ होता, ज्यात अजित कुमार आणि त्रिशा मुख्य भूमिकेत होते. त्याचे काही आगामी सिनेमे म्हणजे कूली, मधरासी (सिवाकार्थिकेयनसोबत), जननायकन (थळपती विजयसोबत) आणि किंग (शाहरुख खानसोबत) असे आहेत.
हे ही वाचा: BCCI ला ICC कडून मोठा झटका! भारत पुढील 6 वर्षे WTC फायनलचे आयोजन करू शकणार नाही? जाणून घ्या मोठे कारण
अनिरुद्ध हा अभिनेता रवि राघवेंद्र आणि भरतनाट्यम नृत्यांगना लक्ष्मी रविचंदर यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, रजनीकांतचा पुतण्या म्हणूनही त्याची ओळख आहे, कारण त्याचे वडील रजनीकांतचे मेव्हणे आहेत. काव्या मारनबरोबर त्याचं नातं असल्याच्या चर्चा रंगल्या असल्या तरी अनिरुद्धने लग्नाच्या बातम्यांना पूर्णपणे नकार दिला आहे. त्याने फक्त इतकंच सांगितलं की, “मी सध्या कोणत्याही लग्नाच्या विचारात नाही.”