Bhavit Sheth Education: भावित शेठ आणि हर्ष जैन यांनी 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी म्हणजे आज जगातील सर्वात मोठ्या फॅन्टसी स्पोर्ट्स कंपन्यांपैकी एक असेलेली ड्रीम 11 (Dream11) . कॉलेजमधून पास आउट झाल्यावर करिअर सुरू करताना काही मित्रांमध्ये साध्या बोलण्यातून ही कल्पना आली आणि आज ती लाकोणची कंपनी बनली. आज, ड्रीम 11 हे भारतातील काल्पनिक खेळातील सर्वात मोठे नाव बनले आहे. भावित शेठ आणि हर्ष जैन यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे आज कंपनी एवढं यश बघू शकत आहे. आज आम्ही तुम्हाला ड्रीम 11 चा सह-संस्थापक भावित शेठच्या शैक्षणिक गोष्टींबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात भवित शेठचं किती शिक्षण झालं आहे...
अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या भावित शेठने बेंटले विद्यापीठातून एमबीए केले आहे. अमेरिकेत शिकत असताना, त्याने बेसबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉल आहे त्याच्या आवडीच्या खेळांच्या फॅन्टसी लीग पद्धतींचे अतिशय जवळून निरीक्षण केले. त्या निरीक्षणातून त्याला भारतातही असेच काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. यावेळी त्यांने आणि हर्ष जैन या दोघांनी मिळून भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी ड्रीम 11 घेऊन आले. ड्रीम 11मध्ये प्रामुख्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारख्या स्पर्धांसाठी एक काल्पनिक लीग तयार करण्यात आली. जी काही कालावधीतच खूप प्रसिद्ध झाली.
हे ही वाचा: दिग्वेश राठीचं नोटबुक सेलिब्रेशन! प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर केली विराटसारखी अॅक्शन; BCCI ने दिला झटका
ड्रीम 11 ने भारतातील फॅन्टसी खेळांना एक नवीन स्तर दिला. ड्रीम 11 हे केवळ एक गेमिंग प्लॅटफॉर्म बनले नाही तर एक व्यासपीठ बनले. या ठिकाणी क्रीडाप्रेमी खऱ्या खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे गुण आणि पैसे जिंकण्यासाठी त्यांचे प्लॅन, ज्ञान वापरू शकतात. युजर्स क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बेसबॉल आणि हँडबॉल यांसारख्या अनेक खेळांमध्ये त्यांच्या फॅन्टसी संघ तयार करतात.
हे ही वाचा: 'या' प्रसिद्ध खेळाडूच्या प्रेमात पडली ट्रम्पची सून! व्हायरल फोटोंमुळे उडाली खळबळ
ड्रीम 11 ची सुरुवात लहान स्तरावर झाली, पण त्याची लोकप्रियतेत झपाट्याने वाढली. 2016 मध्ये त्याचे फक्त 20 लाख वापरकर्ते होते, तर आज 220 दशलक्ष (22 कोटी) पेक्षा जास्त लोक ड्रीम 11 शी जोडलेले आहेत. भारतातील क्रिकेटची क्रेझ आणि डिजिटल क्रांतीने त्याला अधिक उंचीवर नेले.