Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीच्या झिवावर रणवीर सिंहची जादू

पाहा हा व्हिडिओ 

धोनीच्या झिवावर रणवीर सिंहची जादू

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आताचा Elle Beauty Awards मधील लूक खूप चर्चेत होता. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडेच खिळल्या होत्या. यावेळी रणवीर सिंह काळा कोट आणि पँट घातली होती. त्यावर काळ्या रंगाची टोपी देखील घातली होती. 

आता महेंद्र सिंह धोनीच्या मुलीचा झिवाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सनग्लासेस लावले आहेत. स्वतः महेंद्र सिंह धोनीने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. झिवा क्रिकेट स्टेडिअममध्ये बसलेली दिसत आहे. 

धोनीने या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, झिवाने जेव्हा हा फोटो पाहिला तेव्हा ती म्हणाली की, त्यांनी माझ्यासारख्या चष्मा का घातला आहे? ती वर आपल्या खोलीत गेली आणि तिने तेथे स्वतःचा चष्मा शोधला. यावर धोनी म्हणतो की, माझी मुलगी बदलली आहे. मी नोटीसही नव्हतं केलं की, तिच्याकडे असा चष्मा होता.  

Read More