Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video

Shikhar Dhawan Video Viral : शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ शेअर केलाय.

Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video

Shikhar Dhawan On wife Call : टीम इंडियाचा  स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या क्रिकेटपासून लांब आहे. गेल्या 3 महिन्यांपासून त्याने एकही सामना खेळला नाही. पंजाब किंग्जकडून खेळताना शिखरने अफलातून कामगिरी केली होती. त्यानंतर त्याची वर्ल्ड कप (World Cup 2023) संघात देखील समावेश झाला नाही. तर दुसरीकडे शिखरच्या खासगी आयुष्यात देखील अनेक प्रॉब्लेम्स सुरू होते. शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ (Video Viral) शेअर केलाय. त्यामध्ये त्याने बायकोचा उल्लेख केलाय.

काय म्हणाला शिखर धवन?

आज बायकोचा फोन आला. ती माफी मागत होती. सो सॉरी बाबू...तू जसं बोलशील तसं करेल.. तू जसा मला ठेवशील तशी मी राहिल, फक्त तू घरी ये. तिच्या या गोष्टी ऐकून माझंही मन भरून आलं. म्हणजे मला माहीत नाही कोणाची बायको होती... पण ज्याची पण होती, ती चांगली होती, असा मजेशीर व्हिडीओ शिखर धवनने शेअर केला आहे. शिखर धवनने त्याच्या इन्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यावर अनेकांनी कमेंट देखील केलीये.

पाहा Video

व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून शिखरने बायकोला टोमणा मारलाय, असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. हरभजन सिंग, जतीन सप्रू आणि कॉमेडियन कीकू शारदा यांनी यावर हसण्याच्या इमोजी कमेंट केल्या आहेत. आता ही रील आहे की रियॅलिटी कसे समजणार?, असा सवाल एका नेटकऱ्यांनी विचारलाय. घटस्फोटानंतर शिखर धवन डिप्रेशनमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता शिखर सोशल मीडियावर अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. 

आणखी वाचा  - शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'

दरम्यान,  शिखर धवन आणि आयशा यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. दोन वर्षांनंतर त्यांना झोरावर नावाचा मुलगा झाला. सुरुवातीला दोघांमध्ये खूप प्रेम होते पण हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं होतं. प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आयेशाने शिखरचा मानसिक छळ केल्याचा आरोप कोर्टाने देखील मान्य केला होता. 

Read More