Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आज रंगणार IND vs ENG 1st Test ! टीव्हीवर आणि ऑनलाइन कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना? जाणून घ्या

India vs England Live Streaming, First Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज शुक्रवारी खेळला जाईल.   

आज रंगणार IND vs ENG 1st Test ! टीव्हीवर आणि ऑनलाइन कधी, कुठे आणि कसा पाहता येईल सामना? जाणून घ्या

When, where and how to watch IND vs ENG 1st Test live on TV and online: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात आज म्हणजेच शुक्रवारपासून होणार आहे. हा पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळवला जाणार आहे. या मालिकेद्वारे भारतीय कसोटी संघासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. कारण आता संघाचं नेतृत्व 25 वर्षाचा युवा खेळाडू शुबमन गिलकडे आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर  शुबमन गिलकडे जबाबदारी आली आहे. कसोटी कर्णधार बनणारा गिल हा भारताच्या इतिहासातील एक तरुण कप्तान ठरला आहे.  याशिवाय संघातही नवीन चेहरे बघायला मिळणार आहेत. 

सामन्याची ठिकाण आणि  वेळ

  • भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना हेडिंग्ले, लीड्स (UK) येथे खेळवला जाईल.
  • सामना 20 जून 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल.
  • टॉस दुपारी 2.30 वाजता होईल.

लंच आणि टी ब्रेकचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)

  • लंच ब्रेक: 5.00 PM
  • टी ब्रेक: 7.20 PM

(नियमित वेळेनुसार बदल होऊ शकतो, हवामान किंवा ओव्हर गतीनुसार याची वेळ बदलू शकते .)

थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

हा सामना Sony Sports Network वर प्रसारित होईल.

ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे होईल?

  • थेट प्रक्षेपण JioHotstar या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
  • तसंच, Crickit या वेबसाइटवर तुम्ही लाइव्ह अपडेट्स देखील फॉलो करू शकता.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन/अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उकर्णधार आणि विकेटकीपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. 

इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ 

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक 

  • भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
  • भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
  • भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
  • भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
  • भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 
Read More