Team India Schedule: पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारताने इंग्लंड दौऱ्याचा शानदार शेवट केला.इंग्लंड दौऱ्याचा थरारक शेवट भारताने ओव्हल टेस्टमध्ये 6 धावांनी विजय मिळवत केला आणि 5 कसोट्यांच्या मालिकेला 2-2 ने बरोबरीत रोखलं. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाचा इंग्लंड दौरा संपला असून आता सर्वांचे लक्ष आगामी एशिया कप 2025 वर केंद्रित झाले आहे.
या वर्षीचा एशिया कप T20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असून त्याचं आयोजन यूएई मध्ये होणार आहे. स्पर्धेला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार असून भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यजमान यूएईविरुद्ध खेळणार आहे.
संपूर्ण स्पर्धेतील सर्वात जास्त चर्चिला जाणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना! तो सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये रंगणार आहे. यानंतर, भारत आपला तिसरा लीग सामना 19 सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध खेळेल.
भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान यांना ग्रुप A मध्ये ठेवण्यात आले आहे, तर ग्रुप B मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत.
जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला, तर त्यांच्यातील सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. जर दोघं फायनलपर्यंत पोहोचले, तर चाहते भारत-पाकिस्तान यांच्यात तीन सामने पाहण्याची संधी मिळू शकते.
सुपर फोरच्या सामन्यांना 21 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाविरुद्ध एक सामना खेळेल. यानंतर, टॉप 2 संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील, जो 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
इंग्लंड दौऱ्यापाठोपाठ भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, तर सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा यांसारखे युवा खेळाडू परतू शकतात. तसेच हार्दिक पांड्याही फिट होऊन पुनरागमन करणार, अशी शक्यता आहे.
10 सप्टेंबर: भारत vs यूएई – अबू धाबी
14 सप्टेंबर: भारत vs पाकिस्तान – दुबई
19 सप्टेंबर: भारत vs ओमान – अबू धाबी
टीम इंडिया यंदाही गतविजेता म्हणून एशिया कपमध्ये उतरणार आहे. 2023 मध्ये त्यांनी श्रीलंकेला हरवून जेतेपद मिळवलं होतं. यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्याच्या उद्देशानं भारत मैदानात उतरेल, हे नक्की!