Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्मा कुठे आहे? फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नावर ऋषभ पंतनं दिलं भन्नाट उत्तर

IND VS ENG Test : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी एअरपोर्टवर आलेली असताना तेथे काही फॅन्सनी त्याला रोहित शर्मा कुठे आहे? असा प्रश्न विचारला यावर पंतने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं. 

रोहित शर्मा कुठे आहे? फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नावर ऋषभ पंतनं दिलं भन्नाट उत्तर

IND VS ENG Test : रोहित शर्मा आणि ऋषभ पंत या दोघांमधील बॉण्डिंग क्रिकेट रसिकांनी मैदानात पाहिलीच असेल. अनेकदा रोहित शर्मा ऋषभ पंतला (Rishabh Pant) ओरडताना दिसायचा, दोघांचे मस्ती करतानाचे व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल व्हायचे. आयपीएल 2025 संपवून टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी खेळवली जाणार आहे. मात्र रोहित शर्माने (Rohit Sharma) मे महिन्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यामुळे तो या इंग्लंड दौऱ्यावर संघासोबत नाही. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी एअरपोर्टवर आलेली असताना तेथे काही फॅन्सनी त्याला रोहित शर्मा कुठे आहे? असा प्रश्न विचारला यावर पंतने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांनाच हसू अनावर झालं. 

रोहित शर्मा कुठे आहे?

माजी कर्णधार रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाली. यावेळी एअरपोर्टवर टीम इंडियाचे खेळाडू आले असताना तेथे फॅन्स आणि पापाराझींनी ऋषभ पंतला रोहित शर्मा कुठे आहे? असा प्रश्न विचारला. यावर तो म्हणाला 'तो गार्डनमध्ये फिरतोय'. पंतची ही गोष्ट ऐकून सर्वजण हसू लागले. एका पापाराझीने पंतला विचारले की, 'गार्डनची आठवण येणार का?' यावर पंत म्हणाला की, 'गार्डनची तर खूप आठवण येणार'. 

2024 मध्ये इंग्लंड टेस्ट संघ भारत दौऱ्यावर आलेला असताना विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात रोहित शर्माने मैदानात इकडे तिकडे फिरणाऱ्या खेळाडूंना उद्देशून तंबी देत म्हटले होते की, 'कोणी गार्डनमध्ये फिरताना दिसलं तर बघाच'  रोहितचं हे वाक्य खूप व्हायरल झालं होतं. 

हेही वाचा : विराट कोहलीला लंडनला जायचं असल्याने Victory परेडसाठी RCB ने केली घाई? पोलिसांनी केलेली विनंतीही फेटाळली?

 

 पाहा व्हिडीओ : 

रोहित शर्माने घेतली निवृत्ती : 

टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने 7 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यापूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितने टेस्ट आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे क्रिकेटमध्ये पुढील काळात खेळत राहणार अशी माहिती त्याने स्वतः दिलीये. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन'.  

Read More