Divya Deshmukh Women's Chess World Cup Final 2025 Winner : विदर्भ कन्या दिव्या देशमुख हिने भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर आणि भारतीय खेळाडू कोनेरू हम्पीला हरवून महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. या विजयासह तिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला असा बहुमानही पटकावला आहे. अंतिम सामन्यात दोन्ही भारतीय दिग्गजांमध्ये जोरदार स्पर्धा पाहिला मिळाली. दोन्ही शास्त्रीय सामने अनिर्णित राहिल्यानंतर रॅपिड टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला ज्यात दिव्या देशमुखने हम्पीला 1.5-0.5 असा पराभव करुन तिने विजय मिळवला. यासोबतच बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
तर या शानदार विजयासह, दिव्या देशमुख ही भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली आहे. बुद्धिबळाच्या जगात ग्रँडमास्टर ही पदवी सर्वात प्रतिष्ठित मानली जाते. हे बहुमान मिळवणे कोणत्याही खेळाडूसाठी कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. या विजयानंतर दिव्याला बक्षीस म्हणून सुमारे 43 लाख रुपये मिळणार आहे. तर उपविजेता हम्पी यांना सुमारे 30 लाख रुपये देण्यात येणार आहे.
Divya’s hug to her mom says everything #FIDEWorldCup @DivyaDeshmukh05 pic.twitter.com/jeOa6CjNc1
— International Chess Federation (@FIDE_chess) July 28, 2025
विशेष म्हणजे या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बुद्धिबळपटू पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आले होते. दोन्ही खेळाडू आता 2026 मध्ये होणाऱ्या महिला उमेदवार स्पर्धेसाठी पात्र ठरल्या असून 8 खेळाडूंच्या उमेदवार स्पर्धेत पुढील जागतिक महिला अजिंक्यपद सामन्यात चीनच्या गतविजेत्या जू वेनजुनचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे निश्चित होणार आहे.
जॉर्जिया देशातील बटुमी शहरात खेळल्या गेलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हम्पीचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. बुद्धिबळ विश्वचषक… pic.twitter.com/zTNZzovIcx
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 28, 2025
दिव्या केवळ विश्वविजेतीच बनली नाही तर ती भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर देखील बनली. ग्रँडमास्टर (GM) होण्यासाठी, सहसा तीन ग्रँडमास्टर मानदंड आणि 2500+ FIDE रेटिंग आवश्यक असते. पण काही विशेष आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर, खेळाडूला थेट ग्रँडमास्टरची पदवी देण्यात येते. FIDE महिला विश्वचषक हा त्यापैकी एक मानल गेले आहे. दिव्याच्या आधी, ग्रँडमास्टरचा दर्जा मिळालेल्या तीन भारतीय महिला बुद्धिबळपटूंमध्ये कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली आणि आर. वैशाली या सहभागी आहेत. गेल्या वर्षी भारताचा डी. गुकेश पुरुष गटात बुद्धिबळाचा विश्वविजेता बनला होता.
19-year-old Divya Deshmukh is in tears after winning the 2025 FIDE Women's World Cup! pic.twitter.com/DuFYH0bqT5
— chess24 (@chess24com) July 28, 2025
Heartiest congratulations to 19-year-old @DivyaDeshmukh05 from Nagpur for creating history by winning the FIDE Women’s World Chess Cup!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 28, 2025
In her debut, she becomes the first Indian to clinch the Women’s Candidates Tournament — a phenomenal achievement for Maharashtra and a… pic.twitter.com/IMHhzTgymA
दिव्या देशमुख ही नागपूरची असून तिचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत. दिव्याला खेळात रस तिच्या बहिणीने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केल्यानंतर आला. पण तिने बॅडमिंटनऐवजी बुद्धिबळ खेळण्याचा निर्णय घेतला. दिव्याची चांगली बुद्धिबळपटू होण्याची क्षमता ती पाच वर्षांची असताना दिसली होती, असं तिच्या आई- वडिलांनी सांगितलं आहे.