Who is Yash Vagadia: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवशी एक वेगळीच घटना घडली. सामन्यात असा एक क्षण आला जेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. इंग्लंडच्या संघात एक अनोळखी चेहरा मैदानात उतरला आणि क्रिकेटप्रेमींना पाडून गेला. भारत विरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने त्याच्या जागी अशा एका खेळाडूला उतरवलं जो ना संघाचा भाग होता ना त्याच पदार्पण झालं न्हवतं. महत्त्वाचं म्हणजे तो भारतीय यश वगडिया हा खेळाडू होता.
यश वगाडिया हा भारतीय वंशाचा युवा क्रिकेटपटू आहे. तो मूळचा न्युकॅसल येथे जन्मलेला असून त्याचे आईवडील भारतीय आहेत. तो यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो. उजव्या हाताचा फलंदाज आणि गरजेनुसार ऑफस्पिन गोलंदाजी करणारा वगाडिया यॉर्कशायरच्या 14 वर्षांखालच्या संघातून सुरुवात करत, अंडर-18 आणि अकॅडमी संघाचा कॅप्टन झाला आहे.
हे ही वाचा: ' सचिनच्या नावाआधी...' अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावरुन नवा वाद, गावसकरांनी केली 'ही' मागणी
सध्या तो डरहॅम विद्यापीठात जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास करत असून 2022 मध्ये त्याने यॉर्कशायरसोबत रूकी करार केला. त्याने सीनियर क्रिकेटमध्ये पदार्पण 2024 मध्ये रॉयल लंडन वनडे कपमध्ये वॉरिकशायरविरुद्ध केलं.
We see you, Yash
— Yorkshire CCC (@YorkshireCCC) June 22, 2025
Quality to see our own Yash Vagadia out in the field during today's action #ENGvIND pic.twitter.com/gNANgpI49J
बेन स्टोक्स सातव्या षटकानंतर मैदानाबाहेर गेल्यानंतर वगाडिया काही क्षणांसाठी फील्डिंगसाठी मैदानात उतरला. त्यावेळी भारत 22/1 अशा स्थितीत होता. सोशल मीडियावर त्याची ही एंट्री चर्चेचा विषय बनली.
हे ही वाचा: IND vs ENG: “जा जा…” म्हणत अंगावर गेला, डोळे दाखवले मैदानात सिराज-ब्रुक भिडले! बाचाबाचीचा Video Viral
हेडिंग्ले कसोटीत वगाडिया इंग्लंडच्या मूळ 14 सदस्यीय संघात नव्हता, पण ‘12व्या खेळाडू’ म्हणून स्थानिक खेळाडूंना संधी देण्याच्या उपक्रम अंतर्गत यश वगाडियाची निवड झाली होती. त्याच्यासह जवाद अख्तर आणि नोआ केली या यॉर्कशायरच्या खेळाडूंनाही समान संधी देण्यात आली.
"यॉर्कशायरच्या जवाद अख्तर, नोआ केली आणि यश वगाडिया यांना ENGvsIND कसोटीत 12व्या खेळाडूपदाची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे," असं ट्विट क्लबने केलं.
Great to see Yorkshire’s own Jawad Akhtar, Noah Kelly & Yash Vagadia sharing 12th man duties for the #ENGvIND Test here at Headingley pic.twitter.com/ALlFpr4JHH
— Yorkshire CCC (@YorkshireCCC) June 20, 2025
हे ही वाचा: काळे मोजे घालणं ‘गुन्हा’! ICC च्या नियमामुळे शुभमन गिल अडचणीत, जाणून घ्या 'या' विचित्र नियमाबद्दल
2023 मधील हेडिंग्ले अॅशेस कसोटीतही वगाडिया इंग्लंडच्या सहाय्यक गटात होता, ज्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर इंग्लंड क्रिकेट व्यवस्थापनाचा विश्वास अधोरेखित होतो.