Portugal's 64-year-old Joanna Child Making T20I History: क्रिकेटची क्रेझ जगभरातील अनेक देशात आहे. स्पोर्ट्स आवडणाऱ्या अनेकांना क्रिकेटचे मैदान आकर्षित करते. लहान ते मोठे सगळेच क्रिकेटचे चाहते आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे पोर्तुगालची जोआना चाइल्ड, जिने वयाच्या 64 व्या वर्षी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून इतिहास रचला. पोर्तुगाल संघाने नॉर्वेविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळली, ज्यामध्ये जोआनाने पदार्पण करून इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी ती दुसरी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे.
जोआना चाइल्डने नॉर्वेविरुद्ध 2 धावा केल्या आणि उर्वरित सामन्यांमध्ये तिला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिने गोलंदाजीही केली पण एकही विकेट घेण्यात तिला अपयश आले. तिने 4 चेंडूत 11 धावा दिल्या. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, जोआना चाइल्डच्या संघात 15 वर्षीय खेळाडू इशरत चीमा आणि 16 वर्षीय मरियम वसीम यांचाही समावेश होता.
सॅली बार्टन ही पहिली सर्वात वयस्कर महिला आहे. या क्रिकेटपटूने 66 वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सॅली ही जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाची खेळाडू आहे. तिने एस्टोनियाविरुद्धच्या T20 सामन्यात पदार्पण केले. आता तिचा विक्रम मोडणे किंवा त्याची बरोबरी करणे खूप कठीण होईल.
हे ही वाचा: बुर्ज खलिफामधील तब्बल 22 फ्लॅट्सचा मालक आहे 'हा' भारतीय! एका फ्लॅटची किंमत किती?
हे ही वाचा: सरकारी जॉबही नको.. ना हवी जमीन..विनेश फोगटने प्रशासनाकडून हवंय 'हे' बक्षीस
पोर्तुगाल आणि नॉर्वे यांच्यातील T20 मालिकेत कठीण स्पर्धा दिसून आली. पहिल्या सामन्यात पोर्तुगालने नॉर्वेविरुद्ध 109 धावांचे लक्ष्य राखताना 16 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात नॉर्वेजियन संघाने पुनरागमन केले आणि 137 धावांचे लक्ष्य गाठले. तर, पोर्तुगालने तिसरा सामना 9 विकेट्सने जिंकून मालिका जिंकली.