Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत तमन्ना भाटियाचं अफेअर असल्याची होती चर्चा! अखेर अभिनेत्रीने याबद्दल सोडलं मौन

Tamannaah Bhatia: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाक बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये रज्जाक आणि तमन्ना यांच्यात अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता तमन्नाने यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे.  

'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत तमन्ना भाटियाचं अफेअर असल्याची होती चर्चा! अखेर अभिनेत्रीने याबद्दल सोडलं मौन

Abdul Razzaq vs Tamannaah Bhatia: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटर अब्दुल रज्जाक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण आहे बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया. तमन्ना भाटियाने अलिकेचं एक मुलाखत दिली असून त्याबद्दल अनेक गोष्टींबद्दल केला आहे खुलासा. तेव्हाच पाकिस्तानचा क्रिकेटर अब्दुल रज्जाकबद्दल चर्चा सुरु झाली. याचे कारण आहे 2020 साली दोघांच्या अफेअरच्या चर्चांना मिळालेली हवा ज्यावर तमन्नाने अखेर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

तमन्नाचा थेट सवाल

एका मुलाखतीदरम्यान तमन्ना भाटियाला जेव्हा या अफेअरच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली, "हे पूर्णपणे विनोदी आहे" तिने सांगितलं की तिची आणि अब्दुल रज्जाकची भेट फक्त एकदाच एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात झाली होती. तमन्ना म्हणाली, "सोशल मीडिया एक भन्नाट जागा आहे. त्यावर तर मी काही काळ रज्जाकशी लग्नही केलं होतं! मला माहितही नव्हतं की सर, आपल्याला दोन-तीन मुलं आहेत. मला तुमचं खासगी आयुष्य माहित नाही, पण माझ्यासाठी ही अफवा खूपच लाजिरवाणी होती."

अफेअर कधी सुरू झालं?

वास्तविक, 2020 मध्ये एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती की तमन्ना भाटिया आणि अब्दुल रज्जाक एकमेकांना डेट करत आहेत आणि त्यांनी गुपचूप लग्नही केलं आहे. पण त्या फोटोत दोघं एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनात एकत्र दिसले होते  तिथूनच अफवांचा तुफान सुरू झाला.

कोण आहे अब्दुल रज्जाक?

अब्दुल रज्जाक हा पाकिस्तान क्रिकेटचा एक दमदार अष्टपैलू खेळाडू होता. त्याने 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मध्यमगती गोलंदाजीसोबत रज्जाकच्या आक्रमक फलंदाजीने त्याला विशेष ओळख दिली. अनेक वेळा त्याने एकहाती सामने जिंकून दिले. त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर रज्जाकने पाकिस्तानसाठी 265 वनडे सामन्यांत 5,080 धावा आणि 269 विकेट्स घेतल्या. 46 कसोटी सामन्यांत 1,946 धावा आणि 100 विकेट्स तर टी-20 मध्ये 32 सामन्यांत 393 धावा आणि 20 विकेट्स मिळवल्या.

 

तमन्ना भाटियाचा थेट खुलासा आणि सोशल मीडियावर गाजलेली चुकीची माहिती यामुळे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की अफवा कुठून सुरू होतात आणि त्या कशा व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करू शकतात.

 

Read More