Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL Auction : 8 लाखावरून थेट 8.4 कोटी, चेन्नईने बोली लावलेला समीर रिझवी आहे तरी कोण?

Sameer Rizvi In Chennai Super Kings : चेन्नईने युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने एकीकडे रचिन रविंद्रला खरेदी केलंय. तर आता समीर रिझवी याला देखील ताफ्यात समावून घेतलंय. त्यामुळे आता चेन्नई नव्या दमाचा संघ उभारू लागला आहे.

IPL Auction : 8 लाखावरून थेट 8.4 कोटी, चेन्नईने बोली लावलेला समीर रिझवी आहे तरी कोण?

Chennai Super Kings : यंदा IPL 2024 चा लिलाव दुबईत सुरु आहे. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागत आहे. जे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहेत त्यांच्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळतंय. अनेक संघांनी मोठ्या खेळाडूंवर बोली लावली होती. मात्र, आता चेन्नईने लिलावात मोठा डाव खेळला आहे. उत्तर प्रदेशचा फलंदाज समीर रिझवी याला चेन्नई सुपर किंग्जने 8.4 कोटी रुपयांना करारबद्ध केलं आहे. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. युपीचा हा दमदार खेळाडू एका लिलावात करोडपती झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, समीर रिझवी हा खेळाडू आहे तरी कोण? तगड्या खेळाडूंना वगळता चेन्नईने समीरवर का डाव लावला? पाहुया..

कोण आहे समीर रिझवी?

समीर रिझवी यंदाच्या लिलावात सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो, अशी शक्यता होती. समीर रिझवी हा यूपीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. 20 वर्षीय फलंदाजाने यूपी टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्ससाठी सर्वाधिक षटकार ठोकले होते. युवा युवराज सिंह अशी त्याची ओळख निर्माण झाली होती. त्याने यूपी लीगमध्ये दोन शतके झळकावली आणि स्पर्धेतील केवळ 9 डावात 455 धावा केल्या. रिझवी यूपी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. देशांतर्गत स्पर्धेत समीरने उत्तर प्रदेशसाठी 11 सामन्यांत 134.70 च्या स्ट्राइक रेटने 295 धावा केल्या आहेत. लिलावाच्या सेट-6 मध्ये त्याचा समावेश होता. अशातच चेन्नईने मोठा डाव खेळत त्याला करारबद्ध केलंय.

समीर रिझवीने 23 वर्षांखालील राज्य अ स्पर्धेतही काही ठोस कामगिरी केली होती, जिथं त्यानं उत्तर प्रदेशला विजय मिळवून देण्यासाठी अंतिम सामन्यात 50 चेंडूत 84 धावांची मजबूत खेळी केली होती. रिझवीने या स्पर्धेत सर्वाधिक षटकारही (37) खेचले होते.

चेन्नईचा नव्या छाव्यांवर डाव

चेन्नईने युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने एकीकडे रचिन रविंद्रला खरेदी केलंय. तर आता समीर रिझवी याला देखील ताफ्यात समावून घेतलंय. त्यामुळे आता चेन्नई नव्या दमाचा संघ उभारू लागला आहे.

चेन्नई सुपरकिंग्स : एमएस धोनी, डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोइन अली, शिवम दुबे, निशांत सिंधु, अजय मंडल, राज्यवर्धन हंगरगेकर, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, मथीश पथिराना. 

रचिन रवींद्र- 1.80 करोड़ (बेस प्राइस 50 लाख)

शार्दुल ठाकुर- 4 करोड़ (बेस प्राइस 2 करोड)

डिरेल मिचेल- 14 करोड़ (बेस प्राइस 1 कोटी)

Read More