Zeeshan Ansari Struggle Story: आयपीएल २०२५ मध्ये एक तरुण लेग स्पिनर खूप चर्चेत आला आहे. या २५ वर्षीय तरुण लेग स्पिनरने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच केएल राहुल, फाफ डु प्लेसिस आणि जॅक फ्रेझर मॅकगर्क यांच्या विकेट घेत छाप पाडली. हा २५ वर्षीय गोलंदाज सनरायझर्स हैदराबादकडून खेळत लीगच्या १८ व्या हंगामातून जगातील सर्वात महागड्या क्रिकेट लीगमध्ये पदार्पण केले आहे. या गोलंदाजाच्या अद्भुत गोलंदाजीनंतर आता चाहत्यांना या खेळाडूबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे, कारण यापूर्वी कोणीही झीशान अन्सारी हे नाव ऐकले नसेल. म्हणूनच चला झीशानबद्दल सर्व माहिती जाणून घ्या.
सनरायझर्स हैदराबादने झीशान अन्सारीला अवघ्या ४० लाख रुपयांना खरेदी केले पण आज तो करोडोची कामगिरी करत आहे. झीशान अन्सारी या लेग स्पिनरचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झाला. यूपी लीगच्या पहिल्या हंगामात झीशान सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. स्पर्धेत त्याने तब्ब्ल २४ विकेट घेऊन प्रसिद्धी मिळवली होती. त्याने ऋषभ पंतसोबत भारताकडून अंडर-१९ क्रिकेट देखील खेळले आहे.
झीशानचे कुटुंब अतिशय साधे आहे. त्याच्या कुटुंबात एकूण १९ सदस्य आहेत. झीशानचे वडील नईम अन्सारी हे लखनऊमीध्ये एक टेलरचं दुकान चालवतात. यूपी लीगमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही, त्याला यूपीसाठी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये संधी मिळाली नाही. झीशानला विकेट घेणारा फिरकी गोलंदाज मानले जाते.
आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी झीशान अन्सारीने त्याच्या राज्यासाठी फक्त एकच T-२० सामना खेळू शकला होता. झीशान २०१६ मध्ये अंडर-१९ मध्ये खेळला. 2016 मध्ये तो ऋषभ पंत, इशान किशन आणि सरफराज खान यांच्यासोबत अंडर-19 क्रिकेट खेळला होता. झीशानने उत्तर प्रदेशकडून पाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. या काळात त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत.
झीशानने त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात ३ विकेट्स घेतल्या. यानंतर, दुसऱ्या सामन्यात झीशानने एक विकेट घेतली.पण, तिसऱ्या सामन्यात त्याला यश मिळाले नाही. कर्णधार पॅट कमिन्सला झीशानवर खूप विश्वास आहे. अॅडम झांपासमोरही झीशान अन्सारीलाही खेळवण्यात येत आहे.
Zeeshan Ansari #sarcasm #DCvsSRH #DC #SRH #IPL2025 pic.twitter.com/8ePQ590hCh
— Sarcasm (@sarcastic_us) March 30, 2025
झीशान अन्सारी हा दिवंगत ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर शेन वॉर्नला आदर्श मानतो आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये तो दिग्गज ऑफ-स्पिनर मुथय्या मुरलीधरनकडून शिकत आहे.