Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2026 साठी CSK चा कॅप्टन कोण असेल? 'थाला'ने अखेर दिला संकेत; ऑक्शन, फिटनेस आणि निवृत्तीवरही व्यक्त केलं मत

MS Dhoni on IPL 2026 Mini Auction: पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा गेल्या सिजनमध्ये चांगला खेळ झाला नाही. एमएस धोनीनुसार आता सीएसके संघ लिलावात आपल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करेल.  

IPL 2026 साठी CSK चा कॅप्टन कोण असेल? 'थाला'ने अखेर दिला संकेत; ऑक्शन, फिटनेस आणि निवृत्तीवरही व्यक्त केलं मत

चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघासाठी आयपीएल (IPL 2025) सीझन फारसा समाधानकारक ठरला नव्हता. ऋतुराज गायकवाड आणि नंतर महेंद्रसिंग धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी असतानाही संघाला अपेक्षित यश मिळालं नाही. एकूण १४ सामन्यांत केवळ ४ विजय आणि तब्बल १० पराभव झेलून चेन्नई सुपर किंग्स (CSK)गुणतक्त्याच्या तळात राहिला. आता IPL 2026 च्या तयारीसाठी धोनीने (MS Dhoni) स्वतः पुढाकार घेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या कमकुवत बाजू ओळखल्याचं कबूल केलं आहे. विशेष म्हणजे, एका  कार्यक्रमात त्याने आगामी मिनी ऑक्शन, संघाची रचना आणि स्वतःच्या फिटनेसबाबतही दिलखुलास मत मांडलं.  ज्यामध्ये त्याच्या निवृत्तीबाबतही एक हलकासा संकेत होता.

काय म्हणाला धोनी?

हैदराबादमध्ये 'मॅक्सीव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल्स'च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेला महेंद्रसिंग धोनीने CSK च्या आगामी रणनितीबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. धोनी म्हणाला, "आमच्या संघात काही त्रुटी होत्या, विशेषतः फलंदाजीच्या क्रमाबाबत चिंता होती. पण आता तो विभाग बऱ्यापैकी स्थिर झालेला आहे. ऋतुराज गायकवाडसुद्धा पुन्हा संघात येणार आहे, त्यामुळे गोष्टी अधिक स्पष्ट होतील."

धोनीची रणनीती ठरली?

धोनीने सांगितलं की IPL 2026 साठी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे आणि CSK त्या ऑक्शनमध्ये आपली संघबांधणी सुधारण्यासाठी सज्ज आहे. "आम्हाला बहुतेक वेळा हे समजून घेण्यात यश मिळालं आहे की कुठे चुकतोय. काही त्रुटी आहेत, पण त्या आम्ही ऑक्शनमध्ये सुधारू. टूर्नामेंटच्या सुरुवातीलाच सर्वोत्तम देणं आवश्यक असतं. योग्य नियोजन, योग्य वेळेस योग्य संसाधनांचा वापर  हेच यशाचं गणित आहे," असं धोनीने ठामपणे सांगितलं.

निवृत्तीबाबत धोनी काय म्हणाला?

सतत चर्चेत असलेल्या निवृत्तीबाबतही धोनीला प्रश्न विचारण्यात आला. त्याने मिश्किल अंदाजात उत्तर दिलं की, "माझ्या डोळ्यांची चाचणी झाली आणि मला 'टिक मार्क' मिळाला आहे, म्हणजे मी पुढची 5 वर्षं क्रिकेट खेळू शकतो! पण ही परवानगी फक्त डोळ्यांसाठी आहे. अजून मला माझ्या शरीरासाठीही परवानगी घ्यावी लागेल. मी फक्त डोळ्यांनी क्रिकेट खेळू शकत नाही!" या विधानातून धोनीने आपल्या फिटनेसबाबत आत्मविश्वास दाखवला असला तरी निवृत्तीचा निर्णय तो परिस्थिती आणि शरीराच्या क्षमतेनुसार घेईल, हेही सूचकपणे सांगितलं.

CSK चा पुढचा कर्णधार कोण? 

IPL 2026 मध्ये CSK संघाचं नेतृत्व कोण करेल, यावर अजून कोणतंही अधिकृत उत्तर नाही. पण धोनीने असा संकेत दिला आहे की ऑक्शननंतर संघाचं पुनर्रचनेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. ऋतुराज गायकवाड पुन्हा मुख्य भूमिकेत दिसेल का? की CSK नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

थाला धोनी मैदानावर कायम, तरी पुढची दिशा लवकर ठरणार CSK चा हा 'थाला' जरी वयस्कर असला तरी त्याचा अनुभव, रणनीती आणि नेतृत्वगुण अजूनही संघासाठी अमूल्य आहेत. IPL 2026 मध्ये तो खेळणार का नाही, हे स्पष्ट नाही. पण एक मात्र निश्चित CSK मधील बदलांची सुरुवात धोनीच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे.

 

Read More