Champions Trophy 2025 final match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 शेवटच्या टप्प्यात आली आहे. रंजक ठरलेल्या या मालिकेमध्ये आता शेवटचा सर्वात मोठा सामना म्हणजेच अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने येणार आहेत. याआधी या दोन संघांमध्ये ग्रुप स्टेजचा शेवटचा सेमी फिनाले सामनाही झाला होता, ज्यामध्ये भारताने बाजी मारली होती. मात्र, या सामन्यात आता थेट ट्रॉफीसाठी लढत होणार आहे. पण जर काही कारणास्तव सामना रद्द झाला तर कोणता संघ चॅम्पियन होईल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील आतापर्यंत ऐकून तीन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. पण नॉकआऊट सामन्यांमध्ये, आयसीसी कोणत्याही परिस्थितीत निकाल मिळविण्याचा प्रयत्न करते. यासाठी ग्रुप स्टेजच्या तुलनेत काही वेगळे नियम बनवले गेले आहेत. यावेळी आयसीसीने सेमी फायनलच्या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला होता आणि अंतिम सामन्यासाठीही राखीव दिवस आहे. म्हणजेच 9 मार्चला हा सामना पूर्ण झाला नाही तर 10 मार्चलाही सामना खेळवला जाईल. मात्र नियोजित दिवशी खेळ पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. हे शक्य नसेल तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता त्याच ठिकाणाहून सुरू होईल.
हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, 'या' दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का
दुसरीकडे, सेमी फायनलमधील नियम असा होता की जर सामना रद्द झाला तर गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. पण हे अंतिम फेरीत दिसणार नाही. पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे फायनल रद्द झाल्यास ट्रॉफी वाटून घेतली जाईल. म्हणजेच दोन्ही संघ संयुक्तपणे चॅम्पियन मानले जातील. त्याच वेळी, डकवर्थ-लुईस नियमाचा वापर करून निकाल मिळू शकतो, परंतु यासाठी किमान 25-25 षटकांचा सामना असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा: S*x चेंज ऑपरेशन करुन मुलगी झालेला संजय बांगरचा मुलगा बाबर आझमशी करणार लग्न? जाणून घ्या सत्य
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1998 मध्ये झाली होती. त्या वेळापासून आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम सामना रद्द झाला आहे. वास्तविक, 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही आणि दोन्ही संघांमध्ये ट्रॉफीची वाटणी झाली. त्यावेळीही अंतिम फेरीत राखीव दिवस ठेवण्यात आला होता, मात्र त्यानंतर राखीव दिवशी सुरुवातीपासूनच खेळ खेळला गेला.