Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MI vs CSK सामन्यात सीएसकेचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून का आहे? समोर आले मोठे कारण

Chennai Super Kings players wearing black armbands: रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दुसऱ्या डावात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी काळ्या हाताच्या पट्ट्या बांधल्या होत्या. यामागचे कारण जाणून घ्या   

MI vs CSK सामन्यात सीएसकेचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून का आहे? समोर आले मोठे कारण

MI vs CSK IPL 2025: रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना रंगला.  इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचे सगळे खेळाडू हे काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले होते. हे बघून अनेकांना प्रश्न पडला की सगळ्या चेन्नईच्या खेळाडूंनी असे का केले असेल? चला जाणून घेऊयात... 

आयपीएल 2025 च्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या दुसऱ्या डावात चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधण्यामागे संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवेच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. खेळाडूंनी शोक व्यक्त करण्यासाठी आर्मबँड बांधले होते. अद्याप चेन्नई सुपर किंग्जकडून कोणतेही अधिकृत विधान आले नाही. परंतु स्पोर्टस्टारमधील एका वृत्तानुसार, डेव्हॉन कॉनवेच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सीएसकेने आर्मबँड घातला होता. स्टार स्पोर्ट्सच्या सामन्यानंतरच्या कार्यक्रमात बोलताना, सुरेश रैनाने कॉनवेच्या वडिलांच्या निधनाबद्दलही सांगितले होते आणि श्रद्धांजलीही वाहिली होती. 

हे ही वाचा: "ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात..." 'या' परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला

 

हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर... अंपायरलाच सुनावले, 'हे' ठरले पराभवाचे कारण? Video Viral

कॉनवे सध्या खेळत नाहीये 

 

कॉनवेने शेवटचा सामना 11 एप्रिल रोजी खेळाला होता. चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सीएसके असा हा सामना होता. कॉनवेचा तो शेवटचा सामना होता. त्यानंतर तो लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळला नाही. पण, कॉनवे का खेळत नाही?  याबद्दल कोणतीही माहिती देण्यात प्रसिद्ध करण्यात आली नाहीये. 

हे ही वाचा: IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली SRH ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ

चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या स्थानावर आहे? 

 चेन्नई सुपर किंग्जने सध्या आठ सामन्यांपैकी फक्त दोन विजय मिळवले आहेत. या दोन विजयासह हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. आता पुढील सामना 25 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. मुंबई इंडियन्स सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचा पुढचा सामना 23 एप्रिल रोजी हैदराबादविरुद्ध आहे.

हे ही वाचा: 3 चेंडूत 24 धावा... दमदार रेकॉर्ड करणार 'या' भारतीय फलंदाजाला तुम्ही ओळखता का?

सीएसकेला जोर लावण्याची गरज 

रविवारी रंगलेला मुंबईविरुद्धचा सामना सीएसकेसाठी 'करो या मरो'सारखा होता. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, सीएसकेचे अजूनही 6 सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी संघाला सर्व सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागतील. एका पराभवामुळे सीएसकेचा संपूर्ण खेळ खराब होऊ शकतो.

Read More