Shikhar Dhawan not playing in PBKS vs RR : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (Punjab Kings vs Rajasthan Royals) यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडून मोठे बदल पहायला मिळाले. पंजाब किंग्जचा चक्क कॅप्टनच बदलला. पंजाबचा नियमित कॅप्टन शिखर धवन (Shikhar Dhawan) शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याला गैरहजर राहिला. तर दुसरीकडे राजस्थानचा प्रमुख फलंदाज जॉस बटलर (Jos Buttler) देखील सामना खेळणार नाहीये. त्याचं कारण नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दोन्ही संघात जेव्हा सामना सुरू होणार होता, तेव्हा पंजाबच्या खेम्यात कुजबूज सुरू होती. टॉसवेळी शिखर धवन नाही तर सॅम करन मैदानात आला. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. शिखर धवव दुखापतग्रस्त असल्याने तो सामना खेळणार नाही, असं सॅम करनने सांगितलं. तर दुसरीकडे दुखापतीमुळे शेवटचे दोन सामने खेळू न शकल्याने लियाम लिव्हिंगस्टोन पंजाब किंग्ससाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.
राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जॉस बटलर आणि अनुभवी गोलंदाजी रविचंद्रन अश्विन वेगवेगळ्या दुखापतींमुळे राजस्थानसाठी खेळू शकले नाहीत. त्यांच्या जागी रोव्हमन पॉवेल आणि तनुष कोटियन हे संघात आले आहेत, अशी माहिती कॅप्टन संजू सॅमसनने दिली आहे.
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2024
Rajasthan Royals win the toss and elect to bowl against Punjab Kings.
Follow the Match https://t.co/OBQBB75GgU#TATAIPL | #PBKSvRR pic.twitter.com/szFn2mFyel
पंजाब किंग्जची प्लेइंग इलेव्हन: अथर्व तायडे, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (C), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
पंजाब किंग्जचे इम्पॅक्ट प्लेयर्स : राहुल चहर, आशुतोष शर्मा, विद्वथ कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया, नॅथन एलिस.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (C), रियान पराग, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, तनुष कोटियन, ट्रेंट बोल्ट, केशव महाराज, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
राजस्थानचे इम्पॅक्ट प्लेयर्स : यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, आबिद मुश्ताक.